Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 17 September 2017

एकाच अक्षरावरुन लेख

*'प' ने अनुप्रास अलंकार.*
पारसने पुतण्या परागला पहिल्यांदाच पाठशाळेत पाठविले. पाठवण्यापूर्वी परागच्या पिशवीत पालकांनी पाटी, पेन्सिल, पट्‍‍टी , पाणी, पोळी पुरवली. पाटी- पेन्सिलची पिशवी पाठीवर पेलत पराग पहिल्यांदाच पाठशाळेत पोहोचला. पाठशाळेचे परिचित प्रधानाध्यापक परमगुरु पवन पाडेकरांच्या परवानगीने परिपाठ पार पडला.  परिपाठ पायरी-पायरीने पार पडल्यानंतर पराग पाठशाळेच्या पाणवठ्यावर पाणी पिऊन पाठ्यभाग पठणासाठी पाठशाळेत परतला. परागने पाठशाळेत प्रथमच पुस्तक पाहिले. पाठकाने पढवलेला पाठ्यभाग परागला पक्काच पसंद पडला. पाटी पाण्याने पुसून पराग पाटीच्या पाया पडला. पाठशाळेतील परोपकारी पदवीधर पाठक पारस पाटलांनी पहिल्या प्रयत्नातच परिवर्तन परागच्या पदरी पाडले. 

● *लेखन - प्रकाश हेमा डोंगरे, गेगावकर* ●
'अ' चा अनुप्रास अलंकार.*
अंशकालीन अभियंता असलेला अंकित अभियंता असल्याचा अहंकार अत्यंत अधीरतेने अन् अधाशीपणाने अनुभवत असतो. अनन्यसाधारण असलेल्या अभ्यासाचा अभावच अंकितच्या अडाणीपणास अडसर असतो. अब्जाधीश अंबानी असल्याच्या अविर्भावात अंकित अजूनही अविचारानेच
असत्य अंगिकारत असतो. असला अविचार अंकितला अल्लड, अक्कलशून्य असण्यापासून अडवणारा असेल? अंकितच्या अतिरेकी अविर्भावाचे अप्रूप अंकितच्या अतिवयस्क अतिस्नेही अक्कालासुद्धा  असते. अक्का अमरावतीमध्ये असल्याने अंकितबाबत अस्वस्थ असते. अधिकाऱ्यांचे अधिवेशन अमरावतीमध्ये असल्यास अंकित अधिकाधिक अधिवासात असतो. अंकित अधिकाऱ्यांनाही अंदाजाने, अर्जवाने असेच अजमावत असतो. अर्थातच अशाच अर्जवाने अमरावतीकर अधिकाऱ्यांनी अंकितला अंतःकरणापासून अंगिकारले.
● *लेखन©प्रकाश हेमा डोंगरे, गेगावकर*●
ए-ऐ' चा अनुप्रास अलंकार*
ऐनकरांची एकता एकदातरी एकतारी एकाग्रतेने ऐकते. ऐकण्यासाठीची एवढी एकाग्रता एकट्या एकताकडे एकवटली एवढेच! एकदा एका एकादशीला एकताने एकटेपणाने एर्नाकूलममध्ये एतद्‍‍देशीयांची एकतारी ऐकली. एकतारी ऐकता-ऐकता एकताने एका एँकरकडून - "ऐकणाऱ्यांमध्ये एकोणिसशे एकची ऐषारामी, एकमेवाद्वितीय एलिझाबेथ ऐसाजे. एकतारीत एकप्रकारचा एकसुरी, एकतांत्रिकपणा ऐसाजे..."  ऐसे ऐकले. एलिझाबेथने एकूण-एकासमोर एकतारीबाबत एकसुरी, एकतांत्रिक ऐकवलेले! एलिझाबेथची एवढी ऐट? एव्हाना एकसुरी एकतारी ऐकणाऱ्या एकताने एंकरकडून ऐसें ऐकल्याने एकता, एसॉप एकतारीसाठी एकजुतुटीने एकवटले.
●© *लेखन : प्रकाश हेमा डोंगरे, गेगावकर*●
'आ' चा अनुप्रास अलंकार.*
आंबेजोगाईतील आंगरे आडनावाचा आबा आज आमच्या आजोळी आडमार्गानेच आला. आल्या-आल्या आबाने आमच्या आसपासच्या आमराईतले आंबे आम्हास आहारासाठी आपुलकीने आणले. आंबे आंबट आढळल्याने आम्ही आमचा आमरस आहार आटोपला. आसनगावाहून आगगाडीने आमच्या आजी आपली आप्तभेट आटोपून आत्ताच आजोळच्या  आवासात आल्या. आगगाडीतून आजीने आमच्यासाठी आईसक्रीमहि आणले. आणलेले आईस्क्रीम आजी, आजोबा, आबा आणि आमच्या आप्तांनी आनंदाने आस्वादले. आजीने आणलेले आईस्क्रीम आमच्या आप्तांना आवडले. आज आषाढी आल्याचं आंतर्मनातीेल आवाजावरून आजोबांना आठवले.
© *लेखन-प्रकाश हेमा डोंगरे, शिक्षक, ठाणे मनपा.*
*ख- अनुप्रास अलंकार.*
खान्देशातील खारेगावचा खाशाबा खो-खो खेळ खूप खूप खेळला. खडूस खंडू खोताच्या  खगोलाकृती खोल खाचरात खो-खो खेळताना खाशाबाच्या खांद्याला खाचरातील खिळ्यामुळे खूप खरचटले. खेळलेल्या खेळांपैकी खो-खो खेळ खरंतर खाशाबाचा खास खेळ! खो-खो खेळासाठी खाशाबाने खूप खस्ता खाल्या. खचितच खाशाबा खो-खो खेळ खबरदारीने, खुशीने, खिळाडूवृत्तीने खेळायचा. खाशाबा खमंग खरवस, खजूर, खारट खीरहि खूप खायचा. खीर, खरवस, खजूर, खाकरा खाल्यानंतर खाशाबा खूप खोक -खोक खोकला.   खोकून-खोकून खांद्यापासून खालपर्यंत खंगल्याने खाटेला खिळला. खूप खरमरीत, खमंग खाण्यामुळे खवय्या खाशाबाचा खोकला खूपच खालावला.  खळयुक्त खादीच्या खमीसच्या खिशाला खो-खोचा खिताब खोचणाऱ्या खाशाबाला खंत खरंतर खाटेला खिळल्याची! 'खो-खो'ची
(काल्पनिक)
●© *लेखन : प्रकाश हेमा डोंगरे, शिक्षक, ठाणे म न पा*●
क - अनुप्रास अलंकार*
कमलाने कटरने केक कापला. केक कापताना कपाळ काजळीचा करंडा कलंडून कमलाचे कपडे काळवंडले. कपड्यांवरील काळपटपणा काढण्यासाठी कमलाने कमालीचीे कसरत केली. कपभर केरोसीनने कमलाने कपड्यावरील काळवंडलेली काजळी काढली. किमती कपड्यावरील काजळी काढण्याचे कार्य करणाऱ्या कमलाला काकीने काही काळपर्यंत कनवाळूपणाने कुरवाळले. कमलाची काकी कपड्यांना काज करायचे काम कायमच करते. काकीने कमलावर कधीही क्रुद्‌धपणा केल्याचे कोणाकडून कधी कळले काय? कमलाचे काका केश कर्तनाचे काम काही काळापासून करतात. केस कर्तनाच्या कामाबाब॒तीत काका कधीतरीच कुरबूर करतात. कोणतेही कार्य करताना कमला कमालीचं कठोरपणे करते. कर्तव्यापुढे कधीही कंटाळा न करणारी कमला कामाची कार्यवाही कलाने, कले-कलेने  करते.
●© *लेखन : प्रकाश एच डोंगरे, शिक्षक, ठाणे मनपा*●

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता