Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Wednesday 13 September 2017

DCPS त्यागपत्रे

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन !*
   *SAY- NO DCPS/NPS*
       *( मिशन - त्यागपत्र )*
        *सुचनापत्र*

      मित्रांनो,
                Dcps/nps चे त्यागपत्रे भरून देतांना काय करावे? याबाबत या पोस्टद्वारे सूचना करीत आहोत.
 *त्यागपत्रे कोणाला भरून द्यायची आहेत व कोणती?*
♦ *वैयक्तिक त्यागपत्रे*♦
         ही त्यागपत्रे 1 नोव्हें. 2005 नंतर नियुक्त प्रत्येक कर्मचारी यांनी भरायची आहेत त्यातील अर्जात आपली सर्व माहिती लिहून व स्वाक्षरी करून आपल्या कार्यालयीन प्रमुखा मार्फत dcps/NPS योजनेच्या आपल्या विभागाच्या कार्यालयीन प्रमुखाला द्यायची आहेत.
         Dcps/nps योजनेतील कर्मचाऱ्याच्या प्रशासकीय व अंमलबजावणीतील विविधता बघता आपण वेगवेगळे 4 नमुना त्यागपत्रे तयार केली आहेत ती पुढील प्रमाणे 

1) *_जे dcps धारक आहेत म्हणजे ज्यांना dcps खाते क्रमांक मिळाला आहे असे कर्मचारी_*
◆भरायचा अर्ज नमुना लिंक- https://drive.google.com/file/d/0B6l105vYZ3FoXzVCbzdfVm53ZU0/view?usp=drivesdk

2) *_ज्यांचे अजून dcps व nps खाते उघडण्यात आले नाही असे कर्मचारी_*
◆भरायचा अर्ज नमुना लिंक- https://drive.google.com/file/d/0B6l105vYZ3FoWmpDdXVteHFERnM/view?usp=drivesdk

3) *_जे NPS धारक आहेत म्हणजे ज्यांना NPS क्रंमांक प्राप्त झाला असे कर्मचारी_*
◆भरायचा अर्ज नमुना लिंक- https://drive.google.com/file/d/0B6l105vYZ3FoOHVpWEo1b0JqaUU/view?usp=drivesdk

4) *_जे DCPS धारक आहेत पण NPS खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे असे कर्मचारी_*
◆भरायचा अर्ज नमुना लिंक- https://drive.google.com/file/d/0B6l105vYZ3FoR0oza3kxTTFzX2M/view?usp=drivesdk

         सदर त्यागपत्रे प्रत्येक कर्मचारी यांनी भरून आपल्या कार्यालयीन प्रमुख (ज्यांच्या मार्फत आपले योजनेचे खाते उघडन्याचे प्रस्ताव दिला होता ते) यांना द्यायची आहेत.
        *सदर त्यागपत्राचे एक रिसवूड प्रत (आवक - जावक शिक्यासह) स्वतःकडे ठेवावी व त्याची झेराक्स तालुका अध्यक्ष मार्फत जिल्हाद्यक्ष यांना द्यावी. भविष्यात कायदेशीर लढाईत याचा उपयोग होईल.*
       
-------------------------------
♦ *सामूहिक त्यागपत्रे* ♦
         सामूहिक त्यागपत्रे ही तालुकाध्यक्ष व कार्यकारणी, विविध शासकीय विभागाचे संघटन प्रमुख यांना आपल्या शिलेदारकडून भरून घ्यायची आहेत.
     सामूहिक त्यागपत्रात  वरील वयक्तिक त्यागपतत्रातीलच माहिती आहे. व त्याखाली सर्व कर्मचारी यांचे सही घ्यायची आहे.
   त्यात अनु क्र/नाव/ कार्यलयाचे नाव/dcps-npsक्रमांक/ रुजू तारीख/स्वाक्षरी... अशी सामूहिक माहिती आहे.
          विविध विभागातील कर्मचारी व त्याची योजना विषयक अमलबजावणी लक्षात घेऊन खालील 3 प्रकारचे सामूहिक त्यागपत्रे द्यायची आहेत.
1) *_dcps धारक कर्मचारी व dcps तसेच nps खाते प्राप्त नसलेले कर्मचारी याचे सामूहिक त्यागपत्र._*
◆स्वाक्षरी कार्याचा सामूहिक त्यागपत्र नमुना लिंक- https://drive.google.com/file/d/0B6l105vYZ3FoVENpM0NqUjBYMzA/view?usp=drivesdk
2) *_NPS धारक म्हणजे NPS खाते क्रंमांक प्राप्त कर्मचारी यांचे सामूहिक त्यागपत्र-_*
◆स्वाक्षरी कार्याचा सामूहिक त्यागपत्र नमुना लिंक-
https://drive.google.com/file/d/0B6l105vYZ3FoQUdWdjZuNThuczA/view?usp=drivesdk
3) *_dcps धारक कर्मचारी मात्र ज्यांना NPS खाते उघडणे सुरू आहे असे कर्मचारी_*
◆स्वाक्षरी कार्याचा सामूहिक त्यागपत्र नमुना लिंक- https://drive.google.com/file/d/0B6l105vYZ3FoRDMzOEVfSTFTa0U/view?usp=drivesdk
          वरील त्यागपत्रावर प्रत्येक कर्मचारी यांनी स्वाक्षरी करावी. सदर त्यागपत्रे तालुका अध्यक्ष /विविध शासकीय विभागाचे प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्हाध्यक्ष यांचे कडे जमा करावी.
       जिल्हाध्यक्ष यांनी सर्व तालुक्यातील सामूहिक(स्वाक्षरी पत्र) त्यागपत्रे एकत्र करावी.
       सदर  जिल्हातील सामूहिक त्यागपत्र ची एक प्रत आपल्या विभागीय कार्यकारणीस द्यावी व एक प्रत राज्यकार्यकारणीस द्यावी.
-------------------------------
*************************
 *पुढे या त्यागपत्राचे काय करायचे आहे व फलित काय?*
▪ *तालुका कार्यकारिणी*
            प्रत्येक कर्मचारी याने भरलेले वयक्तिक त्यागपत्र दि. 16 सप्टेंबर ला सर्वाना घेवून संबंधित कार्यालयाला देणे. त्याची रिसवूड प्रत एक कर्मचारी व झेराक्स स्वतःकडे ठेवणे. *येथे वैयक्तिक त्यागपत्राचे कार्य संपते.*
       सर्व कर्मचारी यांचे स्वाक्षरी असलेले सामूहिक त्यागपत्र एक प्रत जिल्हाअध्यक्ष याना देणे.
        
■ *जिल्हाकार्यकारणी-*
        जिल्हातील सर्व तालुक्यातील समुहीक त्यागपत्रे एकत्र करावे. व  हे सामूहिक त्यागपत्र आपल्या जिल्हातील त्या त्या विभागाच्या dcps / nps योजनेच्या आहरण व सनियंत्रण अधिकारी यांना द्यावी. (उदा.जि.प. कर्मचारी बाबतीत मुख्य वित्त लेखाधिकारी)
    त्याची एक प्रत विभागीय कार्यकारणीस( उदा. कोकण, अमरावती.इ.) याना द्यावी.
■ *विभागीय कार्यकारिणी*
             आपल्या विभागातील सर्व जिल्ह्याच्या सामूहिक त्यागपत्र याद्या एकत्र कराव्या.
        व *त्या विभागीय dcps/nps कार्यालय यांना निवेदनसह द्याव्या.* (उदा. शिक्षण विभाग उपसंचालक नागपूर विभाग ई.)
          तसेच सभागाला प्राप्त सर्व जिल्हातील सामूहिक त्यागपत्र याद्याची एक प्रत राज्यकार्यकारिणी ला द्यावी.
■ *राज्यकार्यकारिणी*
         राज्य कार्यकारणीने 6 ही विभागातील प्राप्त याद्या एकत्रित कराव्या. व त्याच्या प्रति निवेदनासह खालील जणांना द्यावी. व त्यांच्याशी बैठका लावण्याचा प्रयत्न करावा.
1) *मुख्यमंत्री म.रा.*
2) *वित्तमंत्री म.रा.*
3) *म.रा. तील प्रत्येक खात्यांच्या मंत्र्यांना*( कारण त्या त्या खात्यातील कर्मचारी यांचे ते निर्णय घेत असतात.)
4) *वित्त सचिव म.रा.*
5) *प्रत्येक खात्याचे सचिव*( उदा.शिक्षण विभाग सचिव)
6) *विरोधी पक्षनेते* (निवेदनासह)
      या प्रकारे त्यागपत्रांची विविध कार्यकारणीने भूमिका पार पाडावी.
*------------------------------*************************
 *यानंतर उचलायची पाऊले*✊✊
        ही त्यागपत्रे दिल्यानंतर शासन काय भूमिका बजावते हे बघणे. बैठक लावल्यास जुनी पेन्शन चा आग्रह धरणे.
       जर शासन मानत नसेल वा बघ्याची भूमिका घेत असेल तर..
♦ *प्रत्येक मंत्र्यांच्या घरावर मोर्चा,घेराव, घंटानाद आंदोलन*♦
      प्रत्येक खात्याचा मंत्री हा त्या खात्यातील कर्मचारी यांचे निर्णय घेता. व आपल्या कल्याणासाठी आपण त्यांना निवडून देतो. जर ते झोपेचे सोंग घेत असतील तर त्यांना जाग करण गरजेचे आहे.
       नोव्हेंबर किंवा डिसेम्बर महिन्या दरम्यान प्रत्येक मंत्रांच्या घरावर मोर्चा नेने,घेराव घालणे, घंटानाद आंदोलन एकाच दिवशी करणे.
     यात त्या - त्या मंत्र्यांच्या स्वजिल्हातील व  शेजारील जिल्हातील सर्व शिलेदार सहभाग घेतील.
♦ *कामबंद आंदोलन(संप)*♦
      तरीही शासन बघ्याची भूमिका घेत असेल तर...त्या विरुद्ध....
         माहे फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये कामबंद आंदोलन पुकाराने ज्यात जुन्या व  नव्या कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेणे.
♦ *या व्यतिरिक्त या त्यागपत्राच्या माध्यमातून दुसरी कायदेशीर लढाई लढायची आहे मात्र गोपनियते मुळे ती सार्वजनिक करता येणार नाही.*♦
      
          *सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे हैे|*
            *देखना हे जोर कितना  बाजूए कातिल मे है |*
 
✊ *लढाई स्वहक्काची... समान पेन्शनची*
        *SAY- NO DCPS/NPS*........... ✊
  ✍      आपला
         *सुनिल दुधे*
         राज्यसल्लागार
       (8275397373)
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*
[9/8, 3:02 PM] Sunil: *!! महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन !!*
✊✊✊✊✊✊✊✊
         *Dcps/NPS योजना त्याग(say- no nps/dcps) बाबत भ्रम व हे नेमकं काय आहे?*
✍ *भाग----*1⃣

     मित्रांनो,
               9 आगस्ट 2017 च्या नागपूर येथिल राज्यबैठकीत राज्यकार्यकारणीने सर्व कर्मचाऱ्यांनी दि.16 सप्टेंबर 2017 ला dcps/nps योजना त्याग करण्याचा निर्णय घेतला. व त्यावर आता सर्वानी सहभागी होऊन एकमताने NO- DCPS/NPS असे म्हणायचे आहे मात्र याबाबत अनेकांना ही मोहीम समजलेली नाही व अनेक बाबतीत भ्रम आहे. त्यांबाबत शंका समाधान करण्यासाठी हा प्रयत्न.
 *(सर्वानी अगोदर त्यागपत्राचे वाचन करावे.)*
*1) dcps/nps त्यागपत्रे आपण लिहून देतोय म्हणजे ही योजना आपण सोडत आहोत काय?*
 *नाही,* आपण सर्वजण जे त्यागपत्रे भरून देत आहोत त्याला आपण त्यागपत्रे हे नाव दिले असले तरी आपण ही योजना सोडत नाही आहोत.
       त्यागपत्राचे नीट वाचन केले असता आपणास असे दिसून येईल की , त्यामध्ये विषयात आपण *माझ्याबाबतीत या योजनेची अंमलबजावणी थांबवावी अशि विनंती करीत आहोत.*  त्यासाठी 10 ते 11 मुद्याद्वारे आपण कार्यालयामार्फत शासनास स्पष्ट सांगत आहोत की,  *या योजनेत माझ्या मृत्यू नंतर व निवृत्त झाल्यावर मला किमान सन्मानाने जगता येईल इतक्या निवृत्ती वेतनाची हमी दिलेली नाही.* कंपन्यांच्या भरवश्यावर मला पेन्शन दिली जाणार त्या कंपन्यांवर माझा विश्वासस नाही. त्यामुळे मला ही योजना निवृत्तीवेतानाची हमी देत नाही त्यासाठी या योजनेची अमलबाजावणी थांबविण्यात यावी. ही विनंती करतोय.
*2)मग त्यागपत्रे देऊन आपण नेमके काय करीत आहोत?*
 आपण आपल्याला या योजनेच्या माध्यमातून होणार अन्याय व शासन बळजबरी समोर करून  dcps व nps योजनेची अंमलबजावणी थांबविण्याची सर्व कर्मचारी मिळून मागणी करीत आहोत.
       जो पर्यंत शासन आपल्याला निवृत्ती वेतनाची हमी देत नाही तो पर्यंत ही योजना आपल्याला राबवू नये अशी स्पस्ट मागणी करीत आहोत.
      त्यात वैयक्तिक व सामूहिक रित्या लाखो कर्मचारी शासनाला निवृत्तीवेतानाची हमी बाबत जाब विचारत आहेत.
*3) योजना सोडणे म्हणजे काय? व त्यागपत्राचा त्याच्याशि संबंध ?*
 योजना सोडणे म्हणजे सरकारला स्पष्ठ लिखित अर्ज देणे की मला सादर dcps/nps योजनेच्या स्तर 1 व स्तर 2 मधून बाहेर पडायकचे आहे. त्यामुळे माझ्या जमा रकमेला अनुसरून 80% रकमेवर मला पेन्शन देण्यात यावी.व 20% रक्कम परत देण्यात यावी.असे लिखित स्वरुपात लिहून देणे होय.
       शासनाने याबत अजूनही काही ठोस कार्यपद्धती आदेशीत  केली नाही. त्यामुळे योजना सोडणे आपल्याला शक्य नाही.
      आपन लिहून देत असलेल्या त्यागपत्रात वरील प्रमाणे काही उल्लेख नाही. त्यामुळे आपण योजना सोडत नाही आहोत.
*4) योजना सोडणे बाबत शासनाच्या gr मध्ये उल्लेख आहे काय?*
 होय, शासन निर्णय दिनांक 31 ऑक्टोबर 2005 च्या शासन निर्णयात पान नं. 2 वर आपण निवृत्त होन्या पूर्वी स्वेच्छेने ही योजना सोडू शकतो पण त्यावेळी एकूण जमा रक्कमेच्या 80 %रक्कमेवर पेंशन मिळेल व 20% रक्कम रोख स्वरूपात परत मिळेल असा उल्लेख आहे.
       *मात्र नेमकी योजना कशी सोडावि याची कार्यपद्धती शासनाने तयार केली नाही त्यामुळे योजना सध्या तरी सोडता येणार नाही.*
*5)त्यागपत्रे भरून देण्याचा उद्देश काय ?*
 या त्यागपत्रातून आपण सर्व कर्मचाऱ्याचा DCPS/NPS योजनवीरूद्ध लिखित स्वरूपात रोष व्यक्त करून या योजनेतून शासन निवृत्तीवेताना विषयक जी बनवाबनवी केली आहे ती समोर करून निवृत्तीवेतनाची हमी मागत आहोत.
      त्यामुळे आपल्याला मृत्यू नंतर व निवृत्ती नंतर किती पेन्शन मिळेल हे स्पस्ट करणे  व ती जुन्या पेन्शन प्रमाणे न्यायपूर्ण असावी याची हमी शासनाकडे मागणे हा आपला उद्देश आहे.    
*6) निवृत्ती वेतनाची हमी (जुनी पेन्शन) म्हणजे काय?*
 जुनी पेन्शन म्हणजेच 1982 व 84 च्या म.रा.ना.से.अधिनियम नुसार *कर्मचाऱ्याना त्याच्या मृत्यू नंतर 30% ते 50% कुटुंब निवृत्तिवेतन , त्याच्या निवृत्ती नंतर 50% निवृत्ती वेतन तसेच स्वेच्छानिवृत्ती वा इतर कारणाने सेवा समाप्ती झाल्यास 30 ते 50% निवृत्ती वेतन जे त्याच्या शेवटच्या मूळपगाराला अनुसरून दिले जाते सोबत आपली जमा निधी गरजे प्रमाने काढणे तसेच सेवा उपदान ( ग्रॅज्युटी ) जी त्याच्या मूलपगाराच्या साडे सोळा पट किंवा मूलपगाराच्या 1/4 रक्कम × झालेल्या सेवेची सहामाही एवढी दिली जाते. तसेच आपल्या पेंशनचे अंशरशिकरं म्हणजे पेन्शन रोख रक्कमेत विकता येणे.*
        ही सर्व मागणी किंवा तरतूद म्हणजे जुनी पेन्शन व निवृत्ती वेतनाची हमी होय.
*7) त्यागपत्रे दिल्याने काय होईल?*
 या त्यागपत्रामुळे कायदेशीर रित्या आपण सर्व कर्मचारी या योजनेतुन आपल्याला निवृत्ती वेतनाची हमी मागील आहोत. त्यामुळे ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी याना नुकसानदेय वाटते व सर्व कर्मचाऱ्याचा या योजनेस लिखित विरोध आहे हे स्पष्ट होईल.
        शासनाला  निवृत्ती वेतनाची हमी द्यावी लागेल.
*8) त्यागपत्रातून शासन dcps/nps योजना विषयी माहिती देऊन ती प्रभावी राबवणार काय?*
 *शक्यच नाही*, कारण महाराष्ट्र शासन मागील 11 वर्षांपासून ही योजना राबवित आहे. मात्र शिक्षक संवर्ग, जि. प. कर्मचारी, राज्यकर्मचारी व इतर यासर्वबाबतीत वेगवेगळी भूमिका दिसत आहे.  योजना एक पण कुणाला nps कुणाला dcps कुणाला दोन्हीही नाही व अंमलबजावणीही वेगवेगळी दिसत आहे.
        सद्यस्थितीत कर्मचारी मृत्यू पावला तर त्याला उदरनिर्वाह होईल इतकी पेन्शन नाही. काहींना तर एक रुपयाही नाही मिळाला. तसेच योजनेच्या 1 वर्षां त मृत्यू झाल्यास पेन्शन किती मिळेल? या साऱ्या गंभीर बाबी दिसत आहेत.
       केंद्रसरकार च्या धोरणानुसार nps राबविली जाते ते केंद्रसरकार मृतांना जुनी पेन्शन देते व सर्वांना ग्रज्युटीही पण महाराष्ट्र सरकार देत नाही.
     निवृत्ती नंतर किती रक्कम मिळेल हे शासनही सांगू शकत नाही कारण आपल्या कपातीवर या योजनेत पेन्शन मिळते पण शासनाच्या गलथान कारभाराची 10 वर्ष होऊन बऱ्याच जणांचा 1 रुपयाही जमा नाही त्यांना कशी पेन्शन मिळेल.
    त्यामुळे सरकार कडे या योजनेतून निवृत्तीवेतानाची हमी बाबत काहीही ठोस उत्तर नाही त्यामुळे ही योजना प्रभावीपणे राबविणे शक्य नाही.
✊✊✊✊✊✊✊✊
*सदर say DCPS व NPS (त्यागपत्रे) मोहीम याबाबत संभ्रम  व त्याचे उत्तरे  भाग 2⃣ उद्या आपल्यासाठी देत आहोत.*
      *लेखन जास्त झाल्याने वाचायला कंटाळा येऊ शकतो यासाठी हे प्रयोजन.*
आपण आपल्या शंका थेट फेसबुक पेज मार्फत व्यक्त करू शकता.
FACEBOOK id-
*Pension With Sunil Dudhe*
      
             आपला
  ✍ *सुनिल दुधे*
        राज्यसल्लागार
     (8275397373)
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन*
[9/8, 3:02 PM] Sunil: *!! महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन !!*
✊✊✊✊✊✊✊✊
      *Dcps/NPS योजना त्याग (say- no DCPS/NPS) बाबत भ्रम व हे नेमकं काय आहे?*
✍ *भाग--* 2⃣
*(अगोदर उपलब्ध करून दिलेली त्यागपत्रे वाचा)*
 
*8) त्यागपत्रे भरून दिल्याने dcps व nps योजनेची कपात थांबेल काय?*
 *होय*, 
मात्र एकतर सर्व कर्मचारी यांची कपात थांबेल किंवा थांबणारही नाही.
         हा निर्णय संबंधित कर्मचारी वर्गाच्या विभाग प्रमुखा मार्फत घेतला जाईल.
उदा.शिक्षकांसाठी- शिक्षण संचालक म.रा.   जि.प.कर्मचारी साठी- ग्राम विकास विभाग, राज्य कर्मचारी साठी - सामान्य प्रशासन , महानगरपालिका व नगरपालिका कर्मचारीसाठी - नगर विकास विभाग इत्यादी.
      किंवा
सर्व राज्यातील कर्मचारीसाठी वित्तविभाग महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत निर्णय घेतला जाऊ शकतो.
      याचे कारण आपण सर्व 2005 नंतर नियुक्त कर्मचारी dcps/nps योजनेवर अविश्वास व शंका उपस्थित करून त्याची अंमलबजावणी थांबवित आहोत.
त्यामुळे *कुना एकसाठी या योजनेची अंमलबजावणी थांबणार नाही जर थांबेल तर सर्वांसाठी नाहीतर कुणासाठीही थांबणार नाही सर्व निर्णय हे राज्य  शासन स्तरावरून होतील.*
*9) त्यागपत्रे दिल्याने भविष्यात DCPS/NPS योजनेचे आपल्याला कोणतेही लाभ मिळणार नाही काय?*
 सर्व लाभ मिळणार, कारण आपण योजना सोडत नाही आहोत. फक्त त्यातुन आपल्याला काहीही निवृत्तिवेतन मिळत नाही यासाठी अंमलबजावणी थांबविण्याची विनंती करीत आहोत. त्यामुळे आपण योजनेत असल्याने सर्व लाभ आपल्याला मिळतील.
       मात्र या dcps/nps योजनेत आपल्याला भविष्य सुरक्षित करणारे नेमके कोणते लाभ मिळणार हेच आपल्याला व शासनालाही ठाऊक नाही तर यावर चिंता करण्यात अर्थ उरत नाही.
*10) त्यागपत्रे भरून दिल्यास भविष्यात जर dcps/NPS योजना धारकांना कुटुंबनिवृत्ती वेतन व ग्रॅज्युटी शासनाने दिल्यास आपल्याला ते लागू होणार की नाही?*
 सर्व लाभ लागू होणार,
         आपण मुळात ही योजनाच सोडत नसल्याने भविष्यात जर dcps/nps धारकांना कुटुंब निवृत्तिवेतन व ग्रॅज्युटी हे लाभ दिल्यास ते आपल्यालाही लागू होणार आहेत.
     मुळात शासन स्वतःहून असे लाभ देणार नाही जर आपण सर्वांनी योजना त्याग सारखे तीव्र आंदोलनात्मक मार्ग अवलंबिल्यास वरील फायदे आपल्याला मिळू शकतात.
*11) त्यागपत्रे भरून दिल्याने आपण dcps/nps  योजनेत ढवळाढवळ करून स्वतःचे नुकसान तर करीत नाही आहोत ना?*
 नाही, dcps/nps योजनाच एवढी फसवी आहे की त्यातुन होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठून आपल्याला जुनी पेंशन चे निवृत्ती वेतनाच्या हमीचे लाभ पदरी पाडून घेण्यासाठी ही योजनेची अमलबजावणी थांबविणे हा आपला हेतू आहे.
      आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध बंड करणे म्हणजे ढवळाढवळ नव्हे. तर या मोहिमेतून आपले भविष्य सुरळीत करण्याचा फायदा आपण करीत आहोत.
*12) त्यागपत्रे भरून दिल्याने आपला पगार थांबेल काय?*
 *नाही,*  कारण आपण सर्व कायदेशीर मार्गाने करीत आहोत. मुळात पगार व या योजनेचा संबंध आपण जोडू शकत नाही.
          तसेच योजना थांबवा, कपात करू नका अशी मागणी व जबरजस्ती आपण आपल्या कार्यालयास करीत नाही आहोत त्यामुळे पगार थांबणे शक्य नाही.
      ज्याअर्थी आपण महिनाभर शासन नियमाने काम करतोय त्याअर्थी मासिक पगार हा आपला हक्क आहे. आपल्याला आपल्या कामाचा मोबदला वेतन रूपाने मिळतो तो पेंशन योजनेवर अवलंबून आहे तसेच माझ्या पगारात रक्कम कुठे गुंतवावी यावर माझा पूर्ण हक्क आहे.
      त्यामुळे पगार थांवणे शक्य नाही.
-------------------------------
मित्रानो,
       सामूहिक रित्या पहिल्यांदाच सडेतोडरित्या अन्यायकारक शासकीय योजनेचा आपण योजनेवर प्रश्न व शंका ठेऊन शासनाला जाब विचारतोय.
  म्हणतात ना
       *बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर...*
तसेच
     *निवृत्ती वेतनाची हमी दे नाहीतर*
    *तुझ्या dcps/nps चे श्राध्द कर...* -------------------------------
*************************
      लेखन लांब होत असल्यामुळे हे विविध भागात विभाजित करीत आहोत.
      *भाग 3 मध्ये  NPS धारकांच्या त्यागपत्रा विषयक शंकाचे समाधान करूया...*
आपण आपल्या शंका थेट facebook पेज मार्फत विचारू शकता
Facebook page-
Pension with Sunil Dudhe
             आपला
   ✍ *सुनिल दुधे*
         राज्यसल्लागार
        8275397373
*महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन हक्क संघटन*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता