Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 8 December 2017

हैक होऊ शकतो तुमचा स्मार्टफोन

तात्काळ डिलीट करा हे 42 Apps
www.espjoshi.blogspot.in
सौजन्य: लोकसत्ता
42 Apps Indian Government Says They're All *"Chinese Spyware"*

1. Weibo, 2. WeChat, 3. SHAREit, 4. Truecaller, 5. UC News, 6. UC Browser, 7. BeautyPlus, 8. NewsDog, 9. VivaVideo- QU Video Inc, 10. Parallel Space, 11. APUS Browser, 12. Perfect Corp, 13. Virus Cleaner (Hi Security Lab), 14. CM Browser, 15. Mi Community, 16. DU recorder, 17. Vault-Hide, 18. YouCam Makeup, 19. Mi Store, 20. CacheClear DU apps studio, 21. DU Battery Saver, 22. DU Cleaner, 23. DU Privacy, 24. 360 Security, 25.  DU Browser, 26. Clean Master - Cheetah Mobile, 27. Baidu Translate, 28. Baidu Map, 29. Wonder Camera, 30. ES File Explorer 31. Photo Wonder, 32. QQ International, 33. QQ Music, 34. QQ Mail, 35. QQ Player, 36. QQ NewsFeed, 37. WeSync, 38. QQ Security Centre, 39. SelfieCity, 40. Mail Master, 41. Mi Video call-Xiaomi, 42. QQ Launcher
For details link
https://m.indiatimes.com/technology/news/the-government-has-named-42-apps-chinese-spyware-including-big-names-like-truecaller-334785.html
अलीकडच्या काळात मोबाइल फोनवर अनेक हल्ले होत आहेत. मोबाइल हॅकर्स वापरकर्त्यांचा जीपीएस ‘हॅक’ करून त्याच्या दिनक्रमाची माहिती सहज मिळवू शकतात आणि याचा वापर घरफोडीसारख्या गुन्ह्यांसाठीही करता येऊ शकतो.
दैनंदिन कामांसाठी मोबाइल फोनचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. सगळीकडे मोबाइलचा वापर जास्त होत आहे. मोबाइल आजकाल आवश्यक वस्तूंमध्ये मोडला जात आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते जवळपास सर्वच वयोगटांतील मोबाइलधारक आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांना तर स्मार्टफोनची इतकी सवय असते की, त्यांना फोनशिवाय एक मिनिटही राहणे फार अवघड आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन बहुतेकांना गरजेचाच बनला आहे.
मोबाइल फोन हरवला किंवा चोरीला गेला की त्यात असलेला आपला *प्रायव्हेट डेटा दुसऱ्या कुणाच्या हाती जाण्याची शक्यताच अधिक असते*. आणि यामुळे आपल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते.
*स्मार्टफोनमध्ये क्रेडिट कार्डची माहिती, बँक खाते क्रमांक, पासवर्डस*इत्यादी पर्सनल माहिती ठेवतात तसेच व्यावसायिक मोबाइलमध्ये कॉर्पोरेट डॉक्युमेंट्सही सेव्ह करतात. ज्यामुळे वेळेवर ती त्यांना उपलब्ध होतात; परंतु मोबाइल हरवल्यास ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या हातून निघून जाते.
त्यामुळे *स्मार्टफोन वापरताना खालील काळजी घ्या :*
१. मोबाइलच्या मेमरी कार्डमधील *डेटा ‘एन्क्रिप्ट’ करून ठेवावा,* त्यामुळे डेटा  दुसऱ्याच्या हाती गेला तरी तो सुरक्षित राहील. स्मार्टफोनमधील मेमरी कार्डमधील डेटाही ‘एन्क्रिप्ट’ करून ठेवता येतो.
२. स्मार्टफोनमध्ये *बनावट अ‍ॅप्लिकेशन्स इन्स्टॉल* करणे टाळा. अ‍ॅप्लिकेशन्स बनावट मेल किंवा बनावट मेसेजमधून आलेल्या लिंकवरून डाऊनलोड करू नका.
३. स्मार्टफोनला *पासवर्ड ठेवा.* त्यामुळे काही काळ डेटा सुरक्षित राहील.
४. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या *मोफत वायफायना मोबाइल कनेक्ट करू नका.* कारण इथे मोबाइल अ‍ॅटॅकर्सदेखील कार्यरत असतात, ते वायफायना कनेक्ट केल्यानंतर तुमचा पर्सनल डाटा मिळवू शकतात.
५. फोनमधील *वायफाय, ब्लूटूथ गरज नसल्यास बंद ठेवा.*
呂呂廬撚戀
➖➖➖➖➖➖➖➖
*मोबाइल हल्ल्यांचे प्रकार*
➖➖➖➖➖➖➖➖
*1.सव्‍‌र्हिलन्स अ‍ॅटॅक*
हल्लेखोर मोबाइलच्या जीपीएस यंत्रणेवर हल्ला करून वापरकर्त्यांच्या हालचालींची माहिती मिळवतात. याचा वापर घरफोडीसाठी करता येऊ शकतो.
*2.स्पायवेअर अ‍ॅटॅक*
फोनमधील फसवे अ‍ॅप्स तुमची खासगी माहिती चोरतात.
*3.फिशिंग अ‍ॅटॅक*
मोबाइल फोनमध्ये साठवून ठेवलेले पासवर्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक, बँक खात्यांचे क्रमांक यांची माहिती हल्लेखोर चोरतात.
*'┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄'*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता