Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 9 January 2020

अक्षर खराब येण्याची कारणे



१ ) एकाग्रतेचा अभाव
२ ) लेखनाची इच्छा नसणे , कंटाळा येणे , बॉलपेन व जेलपेनने सराव करणे . पेनाच्या मागे टोपन लावून पेनचे वजन वाढते .

५ ) वही , पेन नीट न धरणे .
६ ) आत्मविश्वास नसणे .
७ ) मन चंचल असणे .
८ ) हात दुखणे .
९ ) नियमित लेखनाचा सराव नसणे .
१० ) जलद गतीने लेखन करणे .
११ ) अक्षरांचे मुळ स्वरुप माहीत नसणे .
१२ ) अक्षर काढण्याचा क्रम माहित नसणे .
१३ ) समजून न घेता फक्त लिहिल्याने अक्षर सराब होते .
१४ ) अक्षरांचे अवयव , काना , मागा वेलांटी नीट योग्य पद्धतीने व काढल्यास .
१५ ) प्रयत्न न करणे .
१६ ) माझे अक्षर चांगले होणारच नाही अशी नकारघंटा सतत वाजवल्यामुळे अक्षर खराबच राहते .
१७ ) त्याला काय होतयं , मला हे असचं जमतं .
१८ ) माझ्या हाताला वळणचं नाही .
१९ ) पहिल्यापासून माझे अक्षर खराबच आहे , ते आता काय सुधारणार.. २० ) अक्षर चांगले काढल्याबद्दल न्यूनगंड मनात असणे .
२१ ) मनात स्वत:ला बदलण्याची इच्छा नसणे .
अक्षर सुंदर काढण्यासाठी काही प्रमुख  उपाय
                
१ ) एकाच वळणात , समान उंचीचे , योग्य अंतर ठेवून लिहावे.
२) तुम्हाला सुयोग्य वाटणारे वळण निवडून जाणीवपूर्वक त्याच वळणात प्रत्येक अक्षर, शब्द, वाक्य लिहावे.
३) सुरुवातीला अक्षर लेखनाची गती कमी ठेवावी.
४) अक्षर, शब्द पूर्ण लिहून झाल्यानंतर शिरोरेषा म्हणजे अक्षरवरची रेषा डावीकडून उजवीकडे वहीच्या रेषेवर सलग व सरळ काढण्याचा सराव करावा .
५ ) अक्षर लिहीताना योग्य दिशेने सुरुवात करावी म्हणजे अक्षराचे अवयव योग्य क्रमाने काढावेत .
६ ) अक्षर सुंदर होईपर्यंत सावकाश लिहावे . लेखनीवर नियंत्रण ठेवून लेखन करावे .
७ ) प्रथम मोठी व ठळक अक्षरे योग्य पद्धतीने काढण्याचा योग्य सराव करावा , 
८ ) मनापासून प्रयत्न करणे, प्रयत्न करतच राहणे, सातत्याने सराव करतच रहावा, चिकाटी सोडू नये.
९ ) ज्यांचे अक्षर सुंदर आहे त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांच्याकडून तंत्र शिकावीत. निरीक्षणातून शिकावे.
१० ) लेखनापूर्वीचा सराव , उभ्या - आडव्या रेषा व इतर अक्षरांचे अवयव यांचा चांगला सराव करुनच अक्षर लेखनाकडे वळावे .
११ ) अक्षर लेखनाचा सराव करण्यासाठी दुरेघी, चाररेघी, आलेख कागद, चौकडी खुणा असलेली वही अक्षरांची उंची , आकार वळण चांगले येण्यासाठी वापरल्यास चांगला फायदा होईल.
१२ )  शुद्ध शब्द, विराम चिन्हे, सुवाच्च हस्ताक्षर हे चांगल्या लेखनाचा मुळ पाया आहेत. हस्ताक्षर सुधारण्यासाठी खूप मेहनत घ्या, कारण प्रथम पडलेली छाप ही शेवटपर्यंत कायम राहते . अभ्यास कौशल्य परिणामकारक होण्यासाठी लेखन कौशल्य खूप महत्त्वाचे असते.
१२ ) दोन ओळी अंतर अक्षराच्या उंचीएवढे असावे. दोन शब्दात र अक्षर लिहिता येईल एवढे अंतर असावे. प्रत्येक अक्षर व अंक ५० ते ६० वेळा काढून सराव केला पाहिजे.

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता