Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 14 August 2016

अर्थ आपल्या राष्ट्रगीताचा


_सौजन्य- महाराष्ट्रtimes_

आपल्या राष्ट्रगीताचा मराठी अर्थ फार थोड्या लोकांना माहीत आहे. स्वत: रवींद्रनाथ टागोर आपल्या या गीताबद्दल म्हणाले होते, *'प्रगती, अधोगतीमुळे ओबडधोबड बनलेल्या मार्गावरून युगानुयुगे प्रवास करणाऱ्या यात्रिकांचा जो चिरसारथी, जन गणाचा जो अंतर्यामी आणि मार्गदर्शक, अशा त्या भारत भाग्य विधात्याचाही या गीतात जयघोष केला आहे.'*

सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी माझ्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात, आपल्या राष्ट्रगीताचा मराठी अर्थ सांगू शकणारे शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य मला लाभले नाहीत. परंतु, आज वयाच्या पन्नाशीत व *'गुगल'च्या जमान्यातही* हीच परिस्थिती कायम राहिली. अनेक क्षेत्रातील उच्चविद्याविभूषित व्यक्तींनाही राष्ट्रगीताचा मराठी अर्थ सांगता येत नाही, असे माझ्या लक्षात आले आहे. साधारणत: १५ वर्षांपूर्वी आकाशवाणीच्या (बहुदा) पुणे केंद्रावरून प्रसारित कार्यक्रमात 'स्वरलिपी'सह राष्ट्रगीताचा मराठी अर्थ सांगण्यात आला. तो कार्यक्रम मी ऐकला. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रसारित झालेला कार्यक्रम मी रेकॉर्ड केला. पुढील पिढीसाठी तो मला आवर्जून प्रसिद्ध करावा वाटला.
📝
*राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राचे गीत.* आपल्या मनात आपल्या राष्ट्राविषयी जे प्रेम वाटते, जो आदर वाटतो ते व्यक्त करणारे हे गीत. प्रत्येक देशाचे आपापले राष्ट्रगीत असते. राष्ट्रगीत म्हणजे आपल्या राष्ट्राचा मानबिंदू. म्हणून ते म्हणताना ताठ व स्तब्ध उभे राहायचे असते.

*भारताचे थोर कवी, नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत रचले आहे.* रवींद्रनाथ टागोर हे बंगालचे. त्यामुळे संस्कृत वळणाच्या बंगाली भाषेतून त्यांनी हे गीत लिहिले आहे. महात्मा गांधी यांनी या गीताला *भारताचे भक्तिगीत* म्हटले आहे. तर स्वत: रवींद्रनाथ आपल्या गीताबद्दल म्हणाले होते, 'प्रगती, अधोगतीमुळे ओबडधोबड बनलेल्या मार्गावरून युगानुयुगे प्रवास करणाऱ्या यात्रिकांचा जो चिरसारथी, जन गणाचा जो अंतर्यामी आणि मार्गदर्शक, अशा त्या भारत भाग्य विधात्याचाही या गीतात जयघोष केला आहे.'
  *┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या गीताचे हिंदी रूपांतर केले व त्यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक हे गीत गात असत.
*२७ डिसेंबर १९११ या दिवशी राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर हे गीत पहिल्यांदा गायले गेले.*
२४ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय घटना परिषदेने *पहिल्या कडव्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता* दिली. (पाच कडव्यांपैकी) आता आपण आपल्या राष्ट्रमातेची गाणी मुक्तकंठाने गातो. कारण आपल्या सर्व भारतीयांची आई एकच आहे. ती म्हणजे भारतमाता. आपल्या स्वत:च्या आईबद्दल जी भावना मनात असते तीच भावना भारतमातेबद्दल आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जन-गण-मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता
*तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!*

पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग।
*पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, द्राविड म्हणजे दक्षिण भाग, उत्कल म्हणजे आताचा ओडिशा, बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.*

विंध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधितरंग।
*विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.*

तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे;
गाहे तव जय गाथा।
जन-गण मंगलदायक जय है,
भारत-भाग्य-विधाता।
*हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.*

जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय है।।
*तुझा जय जयकार. त्रिवार जयजयकार.*
  *┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता