Phase-3 जिल्हांतर्गत बदली
www.espjoshi.blogspot.in
📌 सध्या सुरू असलेला टप्पा: विशेष संवर्ग 1 व 2 चे Form भरणे
● कालावधी: 07.06.2025 ते 08.06.2025 (मध्यरात्री 12 वाजेपर्यंत)
बदली पोर्टलवर संवर्ग 1 व 2 मध्ये लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांची नोंद सुरू आहे. सध्या फक्त सेवाविषयक माहिती व बदलीसाठी होकार/नकार नोंदवायचा आहे. अर्ज पात्र ठरल्यानंतर 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरावा लागेल.
महत्त्वाची माहिती:
- संवर्ग 1 व 2 साठी होकार/नकार सुविधा लवकरच उपलब्ध होईल.
- जिल्हानिहाय रिक्त पदांच्या याद्या लवकर प्रसिद्ध होतील.
- संवर्ग 1 व 2 साठी फॉर्म भरण्याचे वेळापत्रक लवकर जाहीर होईल.
❓ फॉर्म कोणी भरावे?
संवर्ग 1:
- बदलीपात्र यादीतील शिक्षकांनी होकार (बदली हवी) किंवा नकार (सूट हवी) फॉर्म भरावा.
- बदलीपात्र नसलेले, पण G.R. 18.06.2024 (मुद्दा 1.8.1-1.8.20) नुसार पात्र शिक्षकांनी होकार फॉर्म भरावा.
- अवघड क्षेत्रातील संवर्ग 1 शिक्षकांनी नकार फॉर्म भरणे आवश्यक.
संवर्ग 2:
- जोडीदाराच्या कार्यालयापासून 30+ किमी अंतर असलेले शिक्षक G.R. मुद्दा 1.9.1-1.9.7 नुसार फॉर्म भरू शकतात.
📢 संवर्ग 1 साठी महत्वाच्या बाबी:
1. दोन पर्याय: नकार (सूट) किंवा होकार (बदलीपात्र शिक्षकांना खो).
- निव्वळ रिक्त पदांवर बदली नाही (G.R. 4.2.6).
- नकार हा देखील "लाभ" आहे, दरवर्षी बदली प्रक्रियेत भाग घ्यावा लागेल.
2. सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अनिवार्य (G.R. 4.2.8).
- अपात्र अर्ज रद्द, एक वेतनवाढ कायम बंद (G.R. 28.06.2018, पत्र 11.08.2022).
3. खोटी माहिती आढळल्यास निलंबन, शिस्तभंग कारवाई (G.R. 5.10.4, 5.10.5).
4. दिव्यांग लाभाचा गैरवापर झाल्यास RPWD Act 1995/2016 नुसार कारवाई.
5. संवर्ग 1 मधून बदली झाल्यास 3 वर्षे विनंती बदली नाही (G.R. 4.2.7).
📢 संवर्ग 2 साठी महत्वाच्या बाबी:
1. जोडीदाराच्या 30 किमी परिघातील 30 जागा निवडता येतील.
2. 30 किमी अंतराचा दाखला फक्त कार्यकारी अभियंता (PWD/जिल्हा परिषद) यांचाच ग्राह्य (G.R. 4.3.5).
3. दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात असणे आवश्यक.
4. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द, कारवाई (G.R. 28.06.2018, पत्र 11.08.2022).
5. खोटी माहिती आढळल्यास निलंबन, शिस्तभंग कारवाई (G.R. 5.10.4, 5.10.5).
6. संवर्ग 2 मधून बदली झाल्यास 3 वर्षे विनंती बदली नाही (G.R. 4.3.6).
मोबाईलवर फॉर्म भरण्याची प्रक्रिया:
1. लिंक: https://ott.mahardd.com/
2. मोबाईल नंबर टाका, OTP ने लॉगिन करा.
3. भाषा मराठी निवडा.
4. डाव्या कोपऱ्यातील तीन रेषांवर क्लिक → जिल्हाअतंर्गत → अर्ज.
5. संवर्ग 1 किंवा 2 टॅब निवडा.
संवर्ग 1 फॉर्म:
- Disclaimer (अवघड क्षेत्र राऊंड) ला ✅ टिक.
- नाव, शालार्थ ID, U-DISE तपासा.
- बदलीतून सूट? Yes (नको) किंवा No (हवी).
- प्रकार: Self (1-14) किंवा Spouse (15-20).
- माहिती तपासून Submit, OTP टाका.
संवर्ग 2 फॉर्म:
- Disclaimer (30 किमी दाखला अनिवार्य) ला ✅ टिक.
- जोडीदाराचे अंतर (30+ किमी) नोंदवा.
- प्राधान्यक्रम (1-7):
- प्राधान्य 1: दोघेही जिल्हा परिषद शिक्षक → Primary → जोडीदाराचा शालार्थ ID/मोबाईल.
- प्राधान्य 2-7: जोडीदार इतर विभाग → माहिती टाका.
- माहिती तपासून Submit, OTP टाका.
टीप:
- सध्या शाळा निवडायच्या नाहीत, फक्त संवर्ग 1/2 व उपप्रकार नोंदवा.
- OTP टाकून Submit केल्याशिवाय पर्याय ग्राह्य नाहीत.
- अनावधानाने Withdraw करू नये.
- फॉर्म डाउनलोड किंवा Withdraw करू शकता.
अधिक माहितीसाठी व्हिडिओ :
No comments:
Post a Comment
खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता