Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 6 February 2020

ऑनलाइन बदल्या हव्यात की नको ?


५००० शिक्षकांच्या प्रतिक्रियांचा वृत्तालेख 

Forms response chart. Question title: प्र.१) २०२० मध्ये जिल्हांतर्गत बदल्या संगणकीय प्रणालीद्वारे  ऑनलाइन पद्धतीने करायला हव्यात का?. Number of responses: 4,876 responses.

महाराष्ट्र शासनाने सन २०१८ व २०१९ साली आंतरजिल्हा  बदली व जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संगणकीय प्रणाली विकसित केली. २०२० च्या ऑनलाइन बदल्याकरिता अभ्यासगट स्थापन करुन संघटनांचे ही अभिप्राय मागविले आहेत. त्यातच सर्व शिक्षकांचे अभिप्राय घेण्याकरिता मी सहज एक गूगल फॉर्म तैयार केला व त्यावर अनपेक्षित असे तब्बल ५००० अभिप्राय आले. त्याचा Result वरील वृत्तालेखात पहायला मिळेल. संघटना प्रतिनिधीनी अभ्यासगटा पर्यत  सर्वसामान्य शिक्षकांची  बाजू सक्षमपणे मांडावी हीच एक अपेक्षा. https://tinyurl.com/wxbefeo

संगणकीय बदल्यांमुळे भ्रष्टाचाराला १०० टक्के प्रतिबंध झाला. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा झाला आणि त्यामुळेच ८० टक्के शिक्षक ऑनलाइन बदल्यांचे समर्थन करतात. 

आंतरजिल्हा बदल्याकरिता ऑनलाइन संगणकीय पद्धत योग्य आहे. कारण पूर्वीच्या बदल्यांमध्ये शिक्षकांनी जिल्हाबदली करिता लाखो रुपये खर्च केले. केवळ आपसी बदली या  पर्यायाचा समावेश करुन आंतरजिल्हा बदल्या आहे तशाच ठेवण्यात याव्यात.


जिल्हांतर्गत बदल्यासाठी मात्र  ही पद्धत गुंतागुंतीची आहे.

२०१८ साली बदल्यांचा महोत्सवच झाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. ऑनलाइन बदल्यात बऱ्याच शिक्षकांचा फायदा झाला. म्हणून हीच पद्धत पुढे ठेवावी असा मतप्रवाह आहे.त्या मतांशी मी सहमत आहे.मात्र मी अनुभवलेल्या काही गोष्टी पुढील धोरणात सुधारणा करण्यास सहाय्यभुत ठरतील.

जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये २० पर्याय टाकने हे केवळ जुगार खेळल्या सारखे आहे. कारण आपला ज्येष्ठ नेमके कोणते पर्याय टाकणार हे माहित नसते व आपल्याला कोणती गावे टाकने इष्ट ठरेल याची स्पष्ट कल्पना या बदल्यामध्ये येत नाही. निवडायचे म्हणून २० नावे टाकली जातात  एखादया कनिष्ठ शिक्षकाचे गाव टाकुन त्याला  खो दिला जातो. कधी कधी तर  २० पर्याया नीट न टाकता आल्याने  ज्येष्ठ शिक्षक दुर्गम मध्ये जातो  व कनिष्ठ शिक्षकाला चांगली शाळा मिळते. याचा प्रत्यक्ष अनुभव पत्नीच्या बदली वेळी  आला व् शेवटी विस्थापित रहावे लागले.  एकदा संगणकाने बदली केली की कितीही अर्ज केले तरी आपल्या वरील अन्याय दूर होत नाही. म्हनुनच या बदल्यांमध्ये नशिबाला व अभ्यासाला जास्त महत्त्व आले.

ऑनलाइन बदल्या पारदर्शी होत असल्या तरी दल्या झाल्या नंतर याद्या प्रकाशित न झाल्याने आणखी क्लिष्टता/संशयास्पदता  वाढत जाते.

विनंती बदली कोण करणार आहे याची ही माहिती या बदलीमध्ये इतराना होत नाही.त्यामुळे नेमके किती शिक्षक बदली करणार व नेमक्या कोणत्या जागा रिक्त आहेत हे समजत नाही.

संवर्ग २  पति पत्नीच्या बाबतीत ऑनलाइन बदल्या डोकेदुखी आहे कारण ४० गावांची नावे ती ३० kmच्या आत टाकायची. कोण कोणत्या दिशेला जाईल याची शाश्वती नाही. बरेचजन मागील बदल्यांमध्ये ३०किमीच्या बाहेर फेकल्या गेले.( नंतर यात सुधारना करुन एकानेच फॉर्म भरायचा असे शुद्धिपत्रक निघाले.)

संगणकीय जिल्हांतर्गत बदल्या या भ्रष्टाचाराला आऴा घालत असल्या व पारदर्शक असल्या तरी २० पर्याय देऊन आंधळ्या पनाने खेळल्या जाणार्या खेळाप्रमाने हा खेळ शिक्षकांना खेळावा लागत आहेत.

संवर्ग १ चा मात्र या बदल्याला काही विरोध नसणार कारण ते दरवर्षी बदलीपात्र आहेत व ते जे हव ते घेऊ शकतात.

संवर्ग ४ ला तर जे उरले आहे ते घेण्याची वेळ येते. कधी कधी तर २० पैकी एक ही गाव न मिलाल्याने विस्थापित व्हावे लागते.

जो सर्वात कनिष्ठ आहे त्याने कोणते पर्याय टाकायचे यात संभ्रम आहे कारण तो केवळ त्याच्या पेक्षा कनिष्ठाचीच जागा मागु शकतो.

ऑनलाइन पद्धतीमध्ये सुधारणा:
१. सर्व संवर्ग एकाचवेळी न घेता त्यांचे टप्पे करण्यात यावेत. म्हणजे एका  संवर्गाच्या बदल्या  झाल्यानंतर दुसरा संवर्ग. म्हणजे नेमक्या कोणते २० पर्याय द्यायचे हे चित्र स्पष्ट होईल.
२.विनंती बदली करणाऱ्या शिक्षकांचा राउंड स्वतंत्र घ्यावा जेनेकारुण त्यांच्या जागा ही इतरांना उपलब्ध होतील.
३.पति-पत्नी करिता केवळ एकच संयुक्त फॉर्म भरण्याची सुविधा असावी.
४.यातील खो-खो बंद करण्याकरिता यंत्रणा विकसित करावी.
५.२०१८-२०१९ मधील ऑनलाइन बदल्यामध्ये नुकसान झालेल्या विस्थापितांना संवर्ग १ पूर्वी प्राधान्य देण्यात यावे.
६.सर्वर: फॉर्म भरन्याकरिता असलेले सर्वर strong व उच्च दर्जाचे ठेवावे.
७.याद्या: बदली प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी याकरिता बदल्या झाल्यानंतर याद्या प्रकाशित करण्यात याव्यात.


ऑनलाइन बदल्या न करण्याचे धोरण अवलंबिल्यास उपाय:
१.ऑनलाइन पद्धतीनेच  मात्र सीईओ लेवल वर या जिल्हांतर्गत बदल्या  घ्याव्यात पण यातही जर पदाधिकारी हस्तक्षेप करणार नसतील तरच.
बदली संबंधी सर्व वरिष्ट (आयुक्त,सचिव सीईओ इ.) नी स्वत: किंवा विडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित रहावे.
या बदल्यासाठी कडक नियमावली असावी. गैरप्रकार करणाऱ्यावर जागीच कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी.

 बदली करिता संबंधित बदली पात्र शिक्षकाचे नाव पुकारल्या नंतर स्क्रीन वरील उपलब्ध गावांपैकी जिल्ह्यातील कोणतेही गाव निवडन्याची संधी त्याला द्यावी (ऑनलाइन मध्ये केवळ २० गावे मात्र इथे सर्व)
गाव निवडीनंतर लगेच जागीच त्याला बदली ऑर्डर देऊन कार्यमुक्त करून त्याची रिक्त झालेली जागा स्क्रीनवर इतरांसाठी खुली करावी.(विनंती बदली असेल तरच) 

यामध्ये पतिपत्नी सुद्धा एकाच वेळी येउन दोघाना योग्य असे एकाच दिशेचे गाव डोळसपने निवडू शकतील

एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांचे समुपदेशन शक्य  नसेल तर ३६ दिवसांत ३६ जिल्हे स्वत: ग्रामविकास विभाग उपस्थित राहून पारदर्शक पद्धतीने घेऊ शकते. फॉर्म भरण्यापासून ते गाव मिळेपर्यतचा शिक्षकाचा तान प्रशासन कमी करू शकते. संपूर्ण बदली प्रक्रियेचे विडिओ शूटिंग करून एक कॉपी ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागास सुपुर्द करण्यात यावी.

२०१६ साली परभणी  येथील मा.सीईओ यांनी केलेल्या बदल्या ऑनलाइन प्रमाणेच  होत्या. मात्र प्रत्येक सीईओला तशी हतोटी यायला हवी अन्यथा भ्रष्टाचार होणे टळनार नाही. जर हे शक्य नसेल तर प्रचलित ऑनलाइन पद्धती मध्ये बऱ्याच सुधारणा करने अपेक्षित आहे.

-
एस.पी.जोशी.
spjoshi21@gmail.com
www.espjoshi.blogspot.in
┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄

मागील बदली संदर्भिय लेख  https://goo.gl/Y9CZ88

8 comments:

  1. आंतरजिल्हा बदल्या या मुळ व निवड दोन्हीही प्रवर्गातून कराव्यात.

    ReplyDelete
    Replies
    1. जिल्हा अंतर्गत बदल्या स्थानिक लेवल वर कराव्यात अवघड व सोपे हि संकल्पनाच बंद करावी

      Delete
    2. जिल्हा अंतर्गत बदल्या स्थानिक लेवल वर कराव्यात अवघड व सोपे हि संकल्पनाच बंद करावी

      Delete
  2. प्रथम रत्नागिरी सारख्या डोंगराळ जिल्ह्यातील सुगम दुर्गम शाळांची यादी दूरस्थ व्हावी चिपळूण पासून 6 km वरील शाळा रोडलगतची दुर्गम दाखवली आणि त्याच्या पुढची 7 km ची शाळा सुगम दाखवली या ठिकाणी शंकेला वाव मिळतो

    ReplyDelete
  3. ऑनलाईन बदली प्रक्रिया खूपच पारदर्शक आहे.सर्व संवर्गातील व मानसिक आर्थिक त्रास न होता होणारी असल्याने स्तुत्य आहे .ती अशीच चालू रहावी असे वाटते .

    ReplyDelete
  4. अशा लिंक तयार करून शत्रूत्व वाढवू नये संघटना व शासनस्थरातून चांगले फलित निधेलच

    ReplyDelete
  5. There should be online transfer as transparent.

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता