Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 21 January 2017

एक भाषण- Full format :Read that you can't listen..

आदरणीय व्यासपीठ, सर्व केंद्रप्रमुख व प्रिय शिक्षक मित्रहो.
वेळेच्या अभावाने वाटून गेले की माझे नाव काटले जाईल, तरी संयोजकाने आमचा मान राखला. माझ्या सारख्या सामान्य व्यक्तिस मा.केंद्रप्रमुख यांनी पात्र समजले यात मी माझे भाग्य समजतो.

वेळ खुप झालाय त्यामुळे जास्त वेळ न दवडता मी थेट मुद्द्याला हात घालतो.

हजारो ख्वाहिशें ऐसी की हर ख़्वाहिश पे दम निकले, बहोत निकले अरमान फिर भी कम निकले..!!

याच ओळीप्रमाने आपल्याकडून शासनाच्या हजारों इच्छा आहेत
MDM, SARAL, AADHAR, SELFIE, DIGITAL SCHOOL, ज्ञानरचनावाद असे कितीतरी मुद्दे शासन आपल्यावर थोपवित आहे तरी आपला HM समर्थपने सर्व यशस्वीरित्या पार पाडत आहे. काही काळाने HM is real hero असा quote तयार झाल्याशिवाय राहणार नाही.

शिक्षणाचा मुख्य बिंदु विद्यार्थी हा आहे पण इतरच काम जास्त लागतात, वेगवेगळे प्रयोग शासन करु पाहत आहे आणि यात विद्यार्थी नुकसान जास्त होते याचीच खंत जास्त वाटते.

काल परवाच्या लोकमत ऑक्सिजन ला गूगलचे CEO सुंदर पिचइ यांचा लेख वाचला,  तुम्ही ही तो वाचा. तंत्रज्ञान हा विषय खुप खोल आहे त्याची व्याप्ति खुप आहे. जितक मिळवाव तितक कमीच आहे.

फिनलैंड या देशातील शिक्षण पद्धती जगात नं 1 वर आहे, त्या देशातील शिक्षण पद्धतीचा  अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातुन अभ्यास दौरे निघत आहेत. 60000 रुपये स्वखर्च करून शिक्षक मित्र भेट देउन नवीन काही शिकन्यासाठी जात आहेत.
educationmirror.org या वेबसाइट ला भेट देउन तुम्ही ही फिनलैंड देशाविषयी तेथील शिक्षणपद्धति विषयी सर्व माहिती मिळवू शकता कारण सर्व मुद्दे सांगणे वेळेअभावी शक्य नाही.

आपला देश बराच मागे आहे, आपला तालुका आपण म्हणतो प्रगत आहे पण पश्चिम महाराष्ट्रच्या तुलनेत 'नाही'
अस माझ स्पष्ट मत आहे.
इतर तालुक्याच्या तुलनेत आपण पुढे आहोत हे ही मात्र तितकेच खरे आहे.

बऱ्याचवेळा आपण स्वतःला पुढे आहोत असं म्हणतो आणि यामुळेच प्रगतीची नवनवी शिखरे गाठन्यापासून वंचित राहतो.
आता तुम्ही म्हणाल 'जिस ताली मे खाते हो उसी  मे.......' आणि काय चाललय...!!
तर नाही !!  ताली मध्ये जे पंचपक्वानं नाहीत  ते आणण्यासाठी हे स्पष्ट मत.
कारण यातच आपण समाधानी राहिलो आणि स्वतःला पुढे म्हणत राहु तर आपण जगाच्या खुप मागे राहु.
प्रशंसा सर्वानाच आवडते, दोष कुणाचा ही काढा त्याचा पारा चढ़ल्याशिवाय राहत नाहि, त्यात मी ही आलो. पण हे दोष स्विकारुन प्रगती करण्याचा निर्धार मनात जोपर्यत येत नाही, तोपर्यंत आपण खरे प्रगत आणि आपला महाराष्ट्र प्रगत झाला असे म्हणता येणार नाही.

किती ही अडचणी येवो संकट येवो आम्ही चलत राहु, असे जो म्हनेल तोच सिकंदर...
""चलता रहूंगा पथ पर चलने मे माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिल जाएगी या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा..!

महाराष्ट्रातील पहिली डिजिटल स्कूल करणारे संदीप गुंड यांनी ठाणे जिल्हयातील पष्टेपाडा या दुर्गम अशा ठिकाणी टैबयुक्त शाळा केली
आणि त्याच शाळेचा आदर्श घेऊन आज अख्या महाराष्ट्रात डिजिटलचे, इ-लर्निंग चे वारे पसरले आहे. काष्टे सरांनी एक दिवस कॉल केला आणि पष्टेपाडा येथे जायचे ठरले मी लगेच होकार दिला आणि संदीप गुंड सरांना कॉल केला. ठाणे जिल्हयावर त्यांची प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्ति असल्याने त्यांनी पुढील महिन्यात या असे म्हटले. लवकरच हा दौरा होईल.

आपल्या तालुक्यातील ही पहिली  टैबयुक्त शाळा डिग्रस ज. ची  झाली.
महाराष्ट्राचा हा डिजिटल pattern उड़ीसा हे राज्य अवलंबिनार आहे.
ही खरच महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सर्व शाळा 31 मार्च पर्यंत डिजिटल झाल्या पाहिजेत सर्वजन ते करतील ही.
पण डिजिटल झाल्यानंतर काय??
बऱ्याच शाळामध्ये प्रशिक्षित शिक्षक नाहीत...
किंवा डिजिटल पडद्यावर दाखवायच काय या बाबत स्पष्ट मार्ग ही नाही.
यंग जनरेशन मिळवेल ही साहित्य कुठूनतरी पण बाकीच्यांच काय?

यासाठी शासनानेच एक डिजिटल अभ्यासक्रम तयार करुन सर्व शाळा इंटरनेटने जोडल्या जाव्यात. आणि अंमलबजावनी कडे विशेष लक्ष यावर असाव नाहीतर सर्व डिजिटल साहित्य धूळखात पडल्याशिवाय राहणार नाही !
माझ्या ही शाळेत संगणकाची हिच अवस्था आहे.
प्रयत्न सुरु आहे दुरुस्ती व शाळा डिजिटल करण्याचे एका महिन्यात 3 पालक सभा घेण्यात आल्या, एक महिला तर तडक उठून गेली काय नेहमी नेहमी आम्हाला बोलवता म्हणून. गावकर्यांची पैसे देण्याची मानसिकता नसते पण त्यांना जर डिजिटल चे महत्त्व पटले, वारंवार सांगितले तर ते नक्की देतात.आजपर्यंत 17000 निधी जमा झाला आहे. गरीब परिस्थिति असते, माझ्या गावात तर 70% विद्यार्थी आजी आजोबा कडे राहतात, आई वडील उसतोडी, इतर कामासाठी बाहेरगावी जातात. यामुळे पैसा देण्यास ते असमर्थ ठरतात. शासनाने ही शिक्षक असा लोकवर्गणी करण्यासाठी दारोदर फिरन्यापेक्षा आपली तिजोरी खुली करुन सर्व शाळा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त करुन दिल्या पाहिजेत. बरीच खेडी अशि आहेत तेथून पैसा निघुच शकत नाही, कारण गरीबी..

एकदा सगळा पैसा शासनाने डिजिटल शिक्षणव्यवस्थावर, त्याच्या योग्य अंमलबजावनीवर लावावा, होईल थोड़ कर्ज, पण मला सार्थ विश्वास आहे की हिच पीढ़ी पुढे जाउन आपल्या राष्ट्रास चारपटीने श्रीमंत करेल.

मुलांना खुप आवडत चलचित्र पहायला,
एक दिवस असच शाळेत लैपटॉप नेला, मुलांना खुप attraction वाटल. त्यावरील अ आ इ चे वीडियो, Abcd ची कार्टून्स, छोटी छोटी गाणी त्यांनी खुप आवडीने पाहिली. एवढंच नाहि तर गान्याच्या सुरात सुर त्यांनी मिळविन्याचा प्रयत्न केला ते ही न सांगता.

इ लर्निंग चे खुप फायदे आहेत मूल खुप सहज शिकतात, कच्या मुलांसाठी ही वीडियो लैंग्वेज खुप प्रभावी ठरते, त्यात ही नुसता प्रोजेक्टर असन्यापेक्षा इंटरएक्टिव बोर्ड असेल तर खुपच उत्तम. डिग्रस शाळेचा उपक्रम खरच आदर्श घेण्यासारखा आहे तेथील मूल नक्कीच इतरांच्या तुलनेत एक नव्हे चार पाउल पुढे असतील.

चिकलठाना सारख्या शाळेपासून माझी सुरुवात झाली याचा मला खुप अभिमान आहे त्याच शाळेची देन आहे जो मी आज तुमच्यासमोर उभा आहे. घुले सर, काष्टे सर आणि techno स्टाफ... आज पदोपदी त्या शाळेची आठवण येते.

सगळा टच चा जमाना झालाय, सर्वाच्या हातता एंड्रॉइड फोन ही काळाची गरज बनली आहे. पण याचा वापर आपण फक्त व्हाट्सएप्प आणि फेसबुक साठीच न करता नवीन काहीतरी शिकन्यासाठी केला पाहिजे, आज ही माझ्या ब्लॉग ला काही effect द्यायचे तर ते जमत नाहीत, HTML भाषा कळत नाही.
म्हणून मनात कुठेतरी वाटत आपण खुप मागे आहोत. शिकन्यासारख खुप आहे, गूगल वर माहितीचा सागर आहे.
अहमदनगर, सातारा, ठाणे इ जिल्ह्यात प्रत्येक शिक्षकाचा ब्लॉग आहे, app आहे.
यूट्यूबवर शाळेचे वीडियो आहेत.
मी ही छोटासा प्रयत्न करून वीडियो तैयार केले व युट्यूबला अपलोड केले.
युटुबवर CHIKALTHANA किंवा PIMPRI GO असे सर्च केल्यास तुम्हाला वीडियो दिसतील. तसेच espjoshi.blogspot.in हा ब्लॉग ही, एक App ही आहे, शाळेचे फेसबुक पेज ही आहे
पण तरी कुठेतरी कमीच वाटते...
आणि मनात हिच एक कमी नवीन काहीतरी शिकण्याची उमेद जागी करते...
माझ म्हनन तेच आहे मनात आपण कमी आहोत हा फिल येणे गरजेचे कारण त्याशिवाय नवीन काही आपण शिकु शकत नाही, आपन जर म्हणालो खुप येतय तर कदाचित आपली गत त्या गोष्टीतल्या सश्यासारखी झाल्याशिवाय राहणार नाही. नगर मधिलच माझा मित्र रवि भापकर, ठाण्यातील आनंद आनेमवाड, साताऱ्यातील प्रवीण डाकरे, तानाजी खंडागले, श्रीकृष्ण निहाळ, संदीप उदापुरकर, मोरेश्वर जोशी, प्रदीप कुंभार, संतोष भोंबळे यांनी डिजिटल क्रांतीच केली आहे.
त्यांच्या ब्लॉगला भेट दिल्यावर कळत त्यांच कार्य.

म्हणून मित्र हो शेवटी एवढंच म्हनेल
शिकत रहा, प्रगती करत रहा...
वेळ बदलत आहे तुम्ही ही बदला...
शेवटी निदा फाजली यांच्या काही ओळी आपणास समर्पित करतो आणि माझी रजा घेतो,
"सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो
सभी हैं भीड़ में तुम भी निकल सको तो चलो

इधर उधर कई मंज़िल हैं चल सको तो चलो
बने बनाये हैं साँचे जो ढल सको तो चलो

किसी के वास्ते राहें कहाँ बदलती हैं
तुम अपने आप को ख़ुद ही बदल सको तो चलो

यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता
मुझे गिराके अगर तुम सम्भल सको तो चलो

यही है ज़िन्दगी कुछ ख़्वाब चन्द उम्मीदें
इन्हीं खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो

हर इक सफ़र को है महफ़ूस रास्तों की तलाश
हिफ़ाज़तों की रिवायत बदल सको तो चलो

कहीं नहीं कोई सूरज, धुआँ धुआँ है फ़िज़ा
ख़ुद अपने आप से बाहर निकल सको तो चलो...!!""

जय हिन्द !! जय महाराष्ट्र !!!
-----------------------------------------------------
आपला
एस.पी.जोशी

प्रतिक्रिया अवश्य द्या.
Negative असतील तरी 100% द्याच,
नवीन काहीतरी शिकेन.
(Click on Comment Box)
धन्यवाद !

6 comments:

  1. सरजी आपले भाषण शिक्षकांसाठी उपयुक्त आहे.
    ऐकल्या वाचल्याशिवाय समजणार कसे?
    संपूर्ण भाषण शै.प्रगतीसाठी लाभदायक आहे
    न ऐकताच नेगीटिवचा शिक्का मारला गेला .
    हे चुकिचे झाले .याबद्दल खेद वाटतो.

    ReplyDelete
  2. सरजी आपले भाषण शिक्षकांसाठी उपयुक्त आहे.
    ऐकल्या वाचल्याशिवाय समजणार कसे?
    संपूर्ण भाषण शै.प्रगतीसाठी लाभदायक आहे
    न ऐकताच नेगीटिवचा शिक्का मारला गेला .
    हे चुकिचे झाले .याबद्दल खेद वाटतो.

    ReplyDelete
  3. अप्रतिम. ...पर क्या ईस तरह के भाषण से लोग बदल पाएंगे..अगर थोडासा भी खुदको बदल पाते तो आपको पुरा करने का मौका देने का तो कलेजा राखते..."ज्ञारचनावाद" के नाम का ढिंढोरा पिटने वाले यह लोग क्या उसका मतलब जानते भी है..अगर थोडासा भी जानते तो आपको बात रखने का मौका देते..
    मुर्दो की बस्ती में तेरा क्या सामान बिकेगा...अब कफन की भी जरुरत नहीं जनाजा कबका निकल चुका.....

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता