Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 22 January 2017

Animal 4d App ची माहिती


🖥 *चला,तंत्रज्ञान शिकूया* 🖥
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

*मोबाईल app ची माहिती*
            *भाग :-32*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*तंत्रस्नेही मित्रानो,*
*नमस्कार..!*

आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते
विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच...!
यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची....!
*आज आपण अशा एका नाविन्यपूर्ण व आश्चर्यकारक app चा अभ्यास करणार आहोत कि  ज्या मुळे विद्यार्थी ,शिक्षक,पालक,लहान मोठे सर्वाना च प्राण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार व  आश्चर्या सोबत मनोरंजन व आनंद मिळणार आहे.*

होय.

*या app मुळे कागदावरील प्राणी प्रत्यक्ष  वर्गात, मुलांमध्ये,आपल्यात आलेत व त्यांचा आवाज काढत आहेत असे वाटणार....!*
*म्हणजेच प्राणी व त्यांचे आवाज दोन्ही प्रत्येक्षच.......*
⚡ *Appचे नाव :-*
                
             *Animal 4D + Lite*

⚡ *_Size:-_*
              *फक्त   32.00 MB*

⚡ *_Link:-_*
https://play.google.com/store/apps/details?id=com.OctagonStudio.Animal4DPlusLite
➖➖➖➖➖➖➖➖➖
🖌🖌 *plz,dont edit*🖌 🖌

✍..................
  *संकलन व शब्दांकन :-*
       *υмєѕн υgнα∂є*
              *ѕσℓαρυґ*
    मो.न.
       *99 22 422 445*
      
🖌🖌 *ρℓz,∂σит є∂ιт* 🖌🖌
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*पूर्वतयारी*
*App चा प्रभावशाली व मनोरंजक वापर करण्यासाठी 4D चित्रे/इमेज यांच्या प्रिंट जवळ ठेवा. विविध प्राण्यांची 4D चित्रे (Total 26 4D Animal Images)  Google Drive वर PDF फॉरमॅट मध्ये अपलोड केली आहे, http://goo.gl/30jmj8 या लिंक ला टच करून डाउनलोड करा व प्रिंट काढा.*

1) वरील लिंक टच करून app डाउनलोड करून इन्स्टॉल करा.

2)त्या नंतर एक एक करून प्रिंट केलेले किंवा झेरॉक्स केलेले  4D चित्र प्रकाश चांगला असेल अशा जागेवर ठेवा त्या नंतर animal4d+ हे app ओपन करा.

3) app चालू झाल्यानंतर एक विंडो येईल alphabet लोडिंग डेटा येईल  त्याचे लोडिंग पूर्ण दया .

4) _इंस्ट्रक्शन विंडो ओपन होईल त्याची खली get the card असे ऑप्शन आहे त्याला टच करून येथून ही 4 D चित्र इमेज आपन घेवू शकता.ही विंडो ❎ चिन्ह ला टच करून क्लोज करा._

4)  _क्लोज केल्यानंतर animal 4D app मधून आपल्या मोबाईल चा कॅमेरा ओपन होईल.या नंतर 4D_ _इमेज वर मोबाइल कॅमेरा धरा_
_काही सेँकदत इमेज मधील_ प्राणी,फळे,गवत इत्यादी  आपल्या ला  चित्रांतून  बाहेर आलेला भास् होईल एवढंच नाही तर त्यातून आवाज येईल व  हालते डुलते प्राणी व त्यांचा आवाज ऐकायला मिळेल.
प्रिंट काढलेली 4d चित्रे एक एक करून कॅमेऱ्याच्या समोर धरा._

5) कागद आणि मोबाईल यांची वेगवेगळ्या अँगल नी धरून पहा.
आणखीन आकर्षक,मोठ्या साईझ मध्ये दिसेल.

*लक्षात ठेवा मोबाईल चा कॅमेरा व चित्र/ इमेज या मध्ये हात किंवा इतर गोष्टी येऊ देऊ नका.*

6) *आपण 4D इमेज/ चित्र यांची प्रिंट काढली नसेल तरी पण या app मधून दोन पर्यायाने 4D चा अनुभव घेता येईल.*

A) *app मधील 3D मोड ऑन करून*
app मधून कॅमेरा ओपन झाल्यावर खालील बार वरील उजव्या कोपऱ्यातील  ::: डॉट चिन्ह टच करा. अनेक प्राणी चित्र दिसतील. एक चित्राला टच करा , त्या प्राण्याची माहिती व चित्र मोठे दिसेल. याच पेज च्या वरील उजव्या कोपऱ्यातील 2d to 3d नावाचे ऑप्शन आहे, त्यातील 3D चालू करा. मोबाईल मधेच animal ची हालचाल व आवाज ऐकू येईल, चित्र ला स्पर्श करून, चित्र हलवून विविध angle मधून अनुभव घेता येईल. या पेज वरून 4D इमेज इतरांना share करता येतील.

*B) Animal4D app दुसऱ्या android मोबाईल मध्ये Share करून*

आपण 4D इमेज प्रिंट काढल्या नसतील तर हा दुसरा अगदी सोपा पर्याय आहे. हे app दुसऱ्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल कराआणि app ओपन करा त्यातील मगाशी पाहिलेल्या 2D/3D इमेज एक एक करा व पहिल्या app मधून कॅमेऱ्या समोर धरा . चित्रा प्रमाणे च मोबाईल मधून इमेज बाहेर आलेल्या दिसतील व आवाज आणि हालचाल पण होईल.

*आहे ना 4D चा अनुभव आनंददायीं आणि नाविन्य असणारा ...?*
*App ची साईझ थोडी मोठी आहे पण app च काम पण तसच साईझ प्रमाणे खूप मोठं आहे, एकवेळ अवश्य वापरून पहा. विद्यार्थ्या प्रमाणेच तुम्हालाही नक्कीच आनंद होईल.*

चला तर मग app डाउनलोड करून नवीन तंत्रज्ञान चा अवश्य अनुभव घ्या व इतरांनाही सांगा.
🐗🐴🦄🐝🦀🐜🐺🐒🐸🐍🐢

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता