सर्वप्रथम आपण मराठी विकिपीडियावर (http://mr.wikipedia.org/wiki/ ) आपल्या नावाची "नवीन नोंदणी" (Sign In) अवश्य करावी. आपल्याला लेख संपादन करण्यासाठी त्याची मदत होईल. त्यासाठी पानाच्या वरील उजव्या कोपऱ्यात "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" येथे क्लिक करून नवीन नोंदणी करावी. त्यानंतर आपल्या खात्यात प्रवेश करून संपादनास सुरुवात करावी.
विकिपीडियावर नवीन लेख कसा लिहावा ( संपादन )
नजीकच्या काळापासून विकिपीडियावर नवीन संपादन पद्धती उपलब्ध केली आहे . विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या सुविधेचा उद्देश आहे.
१ ज्या विषयावर आपल्याला लेख लिहावयाचा आहे त्याचे नाव सुरूवातीला मुखपृष्ठावरील शोधखिडकीत टाकून त्यापुढे असलेल्या शोधभिंगावर टिचकी मारा. समजा तुम्हाला कुशावर्त या विषयावर लेख निर्माण करावयाचा आहे तर पुढीलप्रमाणे कृती करा.
२ शोध घेतल्यानंतर त्या विषयावर विकिपीडियात लेख उपलब्ध नसल्यास सुरुवातीच्या ओळीत मराठी विकिपीडियावर “कुशावर्त हा लेख लिहा” असे आपणास दिसेल. हा लेख उपलब्ध नसल्यास कुशावर्त हा शब्द तुम्हाला लाल रंगात दिसेल. त्या लाल रंगात दिसणाऱ्या शब्दावर टिचकी मारावी.
३ आता आपल्याला कुशावर्तची निर्मिती सुरू आहे, असा संदेश दिसेल व त्याखाली असलेल्या संपादन खिडकीत तुम्हाला लेखात टाकावयाचा मजकूर लिहिता येईल.
४ संपादन खिडकीत मजकूर लिहून झाल्यावर वरती उजव्या हाताला जतन करा बटनावर टिचकी मारा आणि लेख विकिपीडियावर प्रदर्शित करा.
(कुशावर्त हा विषय उदाहरण म्हणून दिला आहे. आपणास योग्य वाटेल त्या विषयावर लेखन करु शकता. )
No comments:
Post a Comment
खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता