Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 11 March 2018

बदल्यांबाबत शंका

जिल्हांतर्गत बदल्या 2018 संदर्भात पडलेले काही प्रश्न

पार्श्वभुमी:
              पतिपत्नी एकत्रीकरणांतर्गत आंतरजिल्हा बदली न होऊ शकल्याने मी मागील वर्षी म्हणजे जून २०१७ मध्ये प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आपसी आंतर जिल्हाबदली करुन पत्नीच्या शाळेपासून 30km अंतराच्या आत असलेल्या शाळेत रुजू झालो,
परंतु पत्नीस संबंधित  जिल्ह्यात 10 वर्ष पूर्ण झाल्याने २७/२ च्या GR नुसार पत्नी जिल्हाअंतर्गत बदलीसाठी पात्र ठरत आहे.
पत्नीचा बदली अर्ज पतिपत्नी एकत्रिकरणाचाचा लाभ घेत भरायचे  ठरवले तर मी "जिल्ह्यात शून्य वर्ष होऊन ही पुन्हा बदलीस पात्र" ठरत आहे. म्हणजे मला ही TUC मध्ये 20 गावे द्यावी लागणार
तथापि माझी शाळा तालुक्यापासून 3 km अंतरावरच आहे व मला जिल्हा बदलून आल्यावर पुन्हा बदली करावी असे वाटत नाही कारण पूर्वीच्या जिल्ह्यात २०१६ साली  माझी प्रशासकीय बदली झाली त्यातही त्या शाळेचा पट कमी असल्याने प्रतिनीयुक्तिने बदली, पुन्हा आंतरजिल्हाबदली आणि आता पुन्हा या वर्षी बदली.... असे बदलीचक्र सुरु आहे.

अशा परिस्थितीत काही शंका निर्माण झाल्या आहेत :

१.      जर मी पतिपत्नी एकत्रीकरणाचा लाभ न घेता यावर्षी केवळ पत्नीचाच अर्ज भरला आणि माझ्या  शाळेपासून ३०km च्या बाहेरचे गाव भेटले तर पुढील वर्षी(२०१९) याच GR च्या निर्देशानुसार  30km च्या बाहेर असल्याने  विशेष संवर्ग शिक्षक भाग २ नुसार बदली करुन  ३०KM च्या आतील शाळा  घेता येतील का ? 
यावर्षी अशी risk घ्यावी का  ?

२.      पतिपत्नी एकत्रीकरण म्हणजे दोघांना एकच किंवा एकाच रूटवरील किंवा ३०km च्या आतील शाळा (दिलेल्या 20+20 शाळापैकी) सॉफ्टवेयर देऊ शकेल का ?

३.      पतिपत्नी सेवेत असणाऱ्यांना नकाराचा TAB  देण्याची चर्चा मागील वर्षी झाली होती, तो देणार का ?

४.      हा GR यावर्षीप्रमाणेच पुढच्या ही वर्षी म्हणजे २०१९ साली ही असाच पूर्णतः लागू राहील का ?
म्हणजे 10 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांना व 2018 साली बदली झालेल्यांना, २०१९ साली पुन्हा बदली करता येइल का? का पुन्हा एखादे परिपत्रक, शुद्धिपत्रक काढून अशांना  बदलीस अपात्र ठरविन्यात येइल?

५.      सेवाज्येष्टता  यादीनुसार सीनियर शिक्षकांने जूनियर शिक्षकाचे चे गाव घेतले(भेटले) परंतु सीनियर शिक्षकाचे हे गाव  शेवटपर्यंत  रिक्त राहिले तर यादीत शेवटी नंबर असलेल्या जूनियर शिक्षकास ते गाव घेता येइल का ? 

६.     10 वर्ष पूर्ण  झालेले सर्वच या बदली प्रक्रियेत भरडले जाणार की बदल्यांची काही टक्केवारी निश्चित आहे ?

७.      महिलांना केवळ अवघड क्षेत्रातीलच काही शाळा UNFITFORWOMEN देण्यात आल्याचे समजते परंतु जो जिल्हा संपूर्ण सोप्या क्षेत्रात आहेत त्यातील ही काही गावे अत्यंत अवघड म्हणजे रस्ता नसलेली, बस किंवा वाहतुकीची साधने उपलब्ध  नसलेली, निर्मनुष्य रस्त्याने चालत जावे लागणारी आहेत, मग अशी गावे ही त्यांना देण्यात येणार का ?

तसे पाहता नियुक्ती आदेशावरच जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत काम करण्याची संमती आपण देतो परंतु पतिपत्नी सेवेत असल्याने नुकतीच स्थिर झालेल्या  कुटुंबाची व आपल्या पाल्याची शैक्षणिक,मानसिक गैरसोय होऊ नये व सर्व बाबी माहित होउन योग्य पर्याय निवडून  बदली अर्ज भरता यावा यासाठी हा प्रयत्न.
कृपया जानकारांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तरे द्यावित व शंका निरसन करावे !

आपला
एस.पी.जोशी
spjoshi21@gmail.com
https://goo.gl/ctsxGc

20 comments:

  1. याची उत्तरे शिक्षण विभाग सोडवू शकत नाही ? तर आपण काय सोडवणार !

    ReplyDelete
    Replies
    1. सर्वकाही नियमानूसार योग्य होईल.आपली गैरसोय होणार नाही निश्चित रहा.

      Delete
  2. याप्रमाणेच पती-पत्नी खाजगी संस्था किंवा इतर खात्यात कार्येरत आसणारांची सुद्धा विचारच नाही .?

    ReplyDelete
  3. याप्रमाणेच पती-पत्नी खाजगी संस्था किंवा इतर खात्यात कार्येरत आसणारांची सुद्धा विचारच नाही .?

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. सर 30 k.m.च्या आतील व बाहेरील सर्वांना संवर्ग 2 चा दर्जा द्यावा .सर 2019 नंतर हे शासन राहील याची शाश्वती नाही .सर एकदा बदली झाली की कमीत कमी 3 वर्ष परत बदली नाही .गाव देतांना विचार पूर्वक द्या दोघांना सोईस्कर राहील व 2019 लक्षात ठेवा

    ReplyDelete
  6. जे पती पत्नी 30च्या बाहेर आहेत त्यांना आत आणायचे आणि त्याच क्षणी 30च्या आतील लोकाना विस्थापित करायचे .? ? ? ?
    अडाणी व्यक्तीला सुधा ही चूक कळते.या बदली gr मुळे शिक्षक वर्ग खूप चिडला आहे .खरेतर बदली करण्या ला विरोध .या पूर्वी पण बदल्या होतच होत्या .विरोध आहे तो चुकीच्या बदली धोरणाचा .त्या मधून शिक्षका विषयी असलेली .....भावना दिसून येत आहे .2%लोकानसाठी 98% लोकांच्या चुकीच्या बदल्या करून महाराष्टच्या शिक्षणाची वाट लावायची आहे काय ?

    ReplyDelete
    Replies
    1. खरे तर बदली करण्याला विरोध नाही


      असे वाचा edit line

      Delete
  7. मा. आसिम साहेब व प्रदिप भोसले सरच या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.

    ReplyDelete
  8. बदल्या होणेविषयी अत्यंत गरजेचे आहे.

    ReplyDelete
  9. या बदल्या आटोपल्यावर ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांची बदली केव्हा होईल हे सांगणे कठीण आहे कारण पुढे हा तुघलकी निर्णय टिकणारच नाही आणि पुढील बदली धोरणामध्ये बदली करिता पात्र होण्याकरिता काही वर्षे तरी सेवा द्यावी लागेल म्हणजे तो कर्मचारी किमान 7 ,8 वर्षासाठी फिटणार. या प्रक्रियेत ज्युनिअर शिक्षकांची वाट लागणार
    यावर एकच उपाय - वेळोवेळी पत्रव्यवहार करणे व बदल्या झाल्यानंतर यांना न्यायालयात ओढणे किंवा या धोरणात बदल होण्याकरिता सर्व आमदारांना निवेदन देऊन दबाव वाढविणे

    ReplyDelete
    Replies
    1. हेच होणार .सर्व अधिकारी पदाधिकारी सांगून थकलो आहे

      Delete
  10. सर्व नियमसंगत होईल...सर्वांचा विचार होईल...वयक्तिक विचार करू नका सर....

    ReplyDelete
  11. पती-पत्नी एकत्रीकरनाअंतर्गत संवर्ग दोन मध्ये बदलीस नकार देण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे.

    ReplyDelete
  12. आपल्या शिक्षण खात्यामद्धे अनेकजण पती-पत्नी सेवेत आहेत.काही जि.परिषद सेवेत,तर काहीपैकी एकजण खाजगी शैक्षणिक संस्थेत, तर काही एकजणच सेवेत आहेत.पण प्राधान्य फक्त जि.प.मद्धे सेवेत असणाऱ्यांंनाच आहे.तेव्हा वरील सर्वच शिक्षकांना योग्य ठिकाणी नेमणूक मिळाली पाहिजे. कुणावरही अन्याय न होता ही प्रक्रिया पुर्ण व्हायला हवी(हा एकच मुद्दा समोर ठेवला तर अनेक गोष्टींना पुर्णविराम मिळेल.)
    शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य टिकले तरच ,तो चांगल्यापद्धतीने आपले अध्यापनाचे काम समाधानाने करेल आणि त्याचे दुरगामी चांगले परिणाम दिसतील.अन्यथा वरील कोणत्याही घटकाचे स्वास्थ्य हिरावून हि प्रक्रिया सुरळीत पार पडणार नाही. आणि त्याचे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होऊन, त्याचे दुरगामी परिणाम एकूणच शिक्षणाच्या गुणवत्तेवर होऊ शकतात. व ते बऱ्याच कालावधी नंतर समोर येतात.
    या बदली प्रक्रियेपुर्वी शिक्षकांनी जीव ओतून काम केले.दर्जा सुधारला.कोट्यावधी रुपये लोकवर्गणीतून जमा केले.तो या प्रक्रियेत अगदी समरस झाला. हा दर्जा पाहून अनेकांनी खाजगी, इंग्रजी शाळेतून आपले पाल्य जि.प.मराठी शाळेत घातले.ही त्याच्या कामाची पोहच पावती होती.पण या बदली प्रक्रियेनंतर सर्वशिक्षक वर्ग स्वास्थ्य हरवून बसला.तो आपल्या कामापासून बाजूला जावू लागला.
    या बदलीप्रक्रियेमुळे चांगले काम वेगाने सुरु होते ,त्याला गतीरोधक निर्माण झाला. एकूणच सर्व शिक्षक मानसिक दृष्टीने न खचता त्याला त्याची कौटुंबीक जबाबदारी ,मानसिक स्वास्थ्य, याचा विचार करुन त्याला सोईनुसार बदली दिली तरच त्याला ही शैक्षणिक जबाबदारी पुर्ण क्षमतेने पेलता येईल.याचा शासन कर्त्यांनी विचार करून नियम तयार करावेत असे प्रांजलपणे वाटते.
    शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य न हिरावून घेता,योग्य समायोजन,नियमावली तयार करुन हि प्रक्रिया पुर्ण केली.सर्व घटकांना योग्य न्याय दिला .तर या जि.प.शाळेच्या दर्जामद्धे 'न भुतोनं भविष्य थी!' एवढी क्रांती करण्याची क्षमता तमाम प्राथमिक शिक्षकांच्यात आहे.व हे सारे, ते जगाला दाखवून देतील याची पुर्ण खात्री आहे.
    - धनाजी माने , इटकरे (इस्लामपुर)
    ९४०३९६३९३४,७०२००२२४२२

    ReplyDelete
  13. या बदली धरणामध्ये आता अतिरिक्त शिक्षकांचे होणारे समायोजन रद्द करून त्यांना बदली पात्र शिक्षक म्हणून आनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. पण मी अतिरिक्त झालो आहे आणि मजिल्ह्यात 10 वर्षे झाली नाहीत. तर मी फॉर्म भरु शकतो का /माझे समायोजन कसे होईल. संपर्क - 9975564477

    ReplyDelete
  14. या बदली धरणामध्ये आता अतिरिक्त शिक्षकांचे होणारे समायोजन रद्द करून त्यांना बदली पात्र शिक्षक म्हणून आनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. पण मी अतिरिक्त झालो आहे आणि मजिल्ह्यात 10 वर्षे झाली नाहीत. तर मी फॉर्म भरु शकतो का /माझे समायोजन कसे होईल. संपर्क - 9975564477

    ReplyDelete
  15. जोशी सर तुमचा नंबर द्या 8208526026

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता