Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 6 February 2016

आपला स्वत:चा ब्लॉग कसा बनवावा

आपला स्वत:चा ब्लॉग कसा बनवावा ?

 
१. इंटरनेट एक्लप्लोरमध्ये www.blogger.com वेबसाईट उघडा.
२. आता त्या पानावरील ' CREATE YOUR BLOG NOW ' वर क्लिक करा.


३. आपल्याकडे जर गुगले ' जी-मेल ' अकांऊंट नसेल तर इथे आपण नविन अकांऊंट बनवू शकता. आणि जर आपल्याकडे गुगलचे ' जी - मेल ' अकांऊट (Gmail) असेल तर त्याच पानावर दिलेल्या 'sign in first' या लिंक वर क्लिक करा. व आपल्या जी-मेल अकांऊट आणि पासवर्ड ने लॉगिन करा.


४. ' जी-मेल' अकांऊंटने लॉगिन केल्यानंतर आपल्यासमोर ' Sign up for Blogger ' चे पान इथे समोर आपणास आपले नाव व ई-मेल पत्ता दिसेल. इथे 'Display Name' समोरील चौकोनात आपणास ज्या नावाने ब्लॉग सुरु करायचा असेल ते नाव द्या. मग खालिल ' I accept the Terms of Service ' पुढील चौकोनावर क्लिक करा. आता त्या खालिल 'CONTINUE' ह्या लिंक वर क्लिक करा.


५. आता आपल्या समोर 'Name your Biog' चे पान उघडेल, त्यात 'Blog title' च्या पुढील जागेमध्ये आपल्या नविन ब्लॉगचे शिर्षक लिहा. नंतर त्याच्या खालिल जागेमध्ये 'Blog address (URL)' पूढे आपल्या ब्लॉगचे नाव लिहा.
http:// (या जागेमध्ये नाव लिहा) .blogspot.com
आपण दिलेले ब्लॉगचे नाव उपलब्ध आहे का ते पाहण्यासाठी त्याच ठिकाणी दिलेल्या 'Check Availability' वर क्लिक करा.
टिप : नाव उपलब्ध आहे ते पाहताना तिथे 'This blog address is availble' असा मॅसेज आला म्हणजे आपणास ज्या नावाने ब्लॉग हवा आहे ते नाव उपलब्ध आहे ब्लॉगचे नाव देताना त्यामध्ये स्पेस (मोकळी जागा) देवू नये.
एकदा का आपणास नाव मिळाले कि 'CONTINUE' ह्या बटणावर क्लिक करा.

६. आता आपल्या समोर ' Choose a template ' हे पान उघडले. इथे आपण आपणास हव्या असलेल्या डिझाईनचा प्रकार निवडा व परत खाली दिलेल्या 'CONTINUE' ह्या बटणावर क्लिक करा (आपण हि डिझाईन नंतर देखिल बदलू शकता.)


७. आता आपल्या समोर ' Your blog has been created ! ' हे पान दिसेल म्हणजेच आता आपल्या ब्लॉग तयार झाला आहे आता आपल्याला हव्या असलेल्या कविता, कथा, माहिती, गोष्टी, घटना, इत्यादी आपल्या ब्लॉगवर टाकण्यासाठी सुरुवात करण्यासाठी खालिल 'START POSTING' ह्या बटणावर क्लिक करा.


८. आता आपल्या पुढे खालिल चित्रामध्ये दाखविलेल ' Posting ' चे पान उघडेल.
त्या चौकोनामध्ये आपणास मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रमाणे बटणे दिसतील त्याचा वापर करुन त्या चौकोनामध्ये आपणास हवे असलेले साहित्य टाईप करा व खाली ह्या बट्णावर क्लिक करा तसेच त्यावरील जागेत 'Titie' समोर शिर्षक द्या.


९. बस्स. इतके केल्याने आपले साहित्य आपल्या ब्लॉगवर येईल व आता आपल्या समोर ' Your blog post published successfully! ' हे पान उघडले या पानावर मोठ्या अक्षरामध्ये असलेल्या ' View Blog ' ह्या बट्णाच्या बाजूला असलेल्या '(in a new window)' ह्या लिंक वर क्लिक करा मग आपणास आपण टाईप केलेले साहित्य आपल्या ब्लॉगवर पानावर पाहता येईल.
आपण पून्हा त्याच पानावरील 'Edit Post' बट्णावर क्लिक करुन आपल्या साहित्यामध्ये फ़ेरबद्ल करुन पुन्हा साठवू शकता अथवा 'Create a new Post' वर क्लिक करुन नविन साहित्य आपल्या ब्लॉगवर टाकू शकता.


१०. पुढच्या वेळेस आपल्या ब्लॉगवर जर काही आपणास काही नविन माहिती द्यायची असल्यास पून्हाे www.blogger.com वेबसाईट आपल्या जी-मेल अकांऊटने लॉगिन केल्यास आपल्यासमोर आपल्या ब्लॉगची माहिती समोर दिसेल, ज्यामध्ये नविन माहिती देण्यासाठी, ब्लॉगची डिझाईन, आपली माहिती, जूनी माहिती डिलीट करण्यासाठी तसेच इतर गोष्टी करण्यासाठी लिंक्स दिसतील.


http://www.sahajach.com 

8 comments:

  1. Nice & inspired information by your blog sir well done

    ReplyDelete
  2. यालाच म्हणतात तंत्रस्हनेही शिक्षक !खुप छान सरजी

    ReplyDelete
  3. यळकोट यळकोट जय मल्हार

    ReplyDelete
  4. Very nice work.... technosevey ...

    ReplyDelete
  5. ब्लाग कसा तयार करावा
    ➖➖➖➖➖➖➖➖➖

    सदरील पोष्ट काळजीपुर्वक वाचुन या पोष्ट मध्ये सांगितले प्रमाणे प्रात्यक्षिक करा.आज आपला स्वतः चा blog खात्रीने सांगतो 100% बनणारच....

    🔴स्टेप 1
    सर्व प्रथम www.blogger.com वर जा

    🔴step 2
    creat new blog ला cljck करा

    🔴step 3
    login होणे
    ------------------------------------------------
    mail id व password टाकून login व्हा.

    🔴स्टेप 4
    ब्लाँग ला शिर्षक व ॲड्रेस देणे
    ------------------------------------------------
    1.आपल्या ब्लाँग ला शिर्षक द्या..

    2. आपल्या ब्लाँग ला ॲड्रेस द्या..
    जसे dattaamrit
    आपण दिलेला हा आय डि तात्काळ व्हेरीफाय होईल .व आसा आड्रेस जर उपलब्ध असेल तर आपल्या ब्लाँग ला
    www.dattaamrit.blogspot.com असा आय डी तयार होईल.
    आता
    खाली दिसणार्या विविध चित्रापेकी हवे ते templete निवडा..

    आता continue म्हणा..

    आता view blog म्हणा

    आता आपल्या ब्लाँग चा first look अपणास दिसेल..(निवडलेल्या templet सह

    🔴स्टेप 5
    Blog ला page ॲड करणे
    ------------------------------------------------ आपल्या ब्लाँग च्या उजव्या कोपर्यात वरती आपण ब्लाँग तयार करताना सुरुवातीला टाकलेला mail id टाकून sign in करा

    🔴स्टेप 6
    ब्लाँग ला पेजेस ॲड करणे
    ------------------------------------------------
    sign in झाल्यवर .त्याच्याच बाजूला design हा option दीसेल त्यवर click करा.

    आता आपल्या ब्लाँग च्या अंतर्गत सेटिंग आपणास
    डाव्या बाजुला एका खाली एक उभ्या स्वरुपात
    overview
    post
    pages
    layout
    आसे महत्त्वाचे option अपणास दिसतील..
    पैकी page वर आपण click करा.
    आता एक window open होईल त्यात वरच्या बाजूला आपणास page tital दिसेल ,तीथे ज्या कोणत्या नावाचे page अपणास हवे ते page tital च्या ठिकाणी नाव टाका..जसे सुविचार हे पेज ला आपन नाव देऊन तयार केले व बाजूला च पिवळ्या पट्टीवर असलेला save/ save arrangament/ publish पैकी जे असेल त्यवर click करा..

    झाले आपले सुविचार नवाचे पेज तयार..

    आशाच प्रकारे
    वरती दाखवल्याप्रमाणे डाव्या बाजुच्या option पैकी पेज वर जाउन हवे तेवढे पेजेस आपण तयर करुन publish/save करत चला...

    🔴स्टेप 7
    तयार केलेले पेजेस ब्लाँग ला ॲड करणे
    ------------------------------------------------ डाव्या बाजुला pages च्या खाली layout नावाचे एक option आहे..
    layout वर click करा..
    एक डायग्राम सारखे दिसेल त्यामध्ये cross coloum व add gadget आसे असेल.
    तीथे click करुन एक gadget ची यादी दिसेल .त्यापैकी pages वर click करा..save म्हणा

    आता pages हे gadget add झालेय.
    त्याला समोरच ऊजव्या कोपऱ्यात edit असेल.तीथे click करा..आपण तयार करुन ठेवलेली सर्व पेजेस ईथे दिसतील..त्या पेजेस ला ब्लाँग वर दिसण्यासाठी क्रम द्या .म्हणजे सर्वात अगोदर कोणते..2नं ला कोणते पेज दिसावे ..हे आपण पेजेस समोरील box ला tik mark करुन ठरवा..
    झाले.

    सेव म्हणा..

    view blog म्हणा..
    आपण तयार केलेले सर्व पेजेस आपल्या ब्लाँग च्या शिर्षकाखाली आडव्या स्वरुपात एकापुढे एक दिसतील.

    🔴 स्टेप 8
    -ब्लाँग ला लिंक देणे..
    ------------------------------------------------ डाव्य बाजुला जी एकखाली एक option आहेत.त्यापैकी एक pages हे option आहे.जीथुन आपण पेजेस तयार केले होते.
    त्या पेजेस वर click करा.
    आपण तयार केलेली सर्व पेजेस ईथे अपणास दिसतील.
    या पेजेस पैकी ज्या पैजला अपणास ज्याची कशाचि लिंक द्यायची असेल.जसे कि vdo.song etc, त्या पेजला click करा..

    आपण पेज तयार करताना जी window open झाली होती अपणा समोर सेम तीच window open झाली असेल
    आपल्या समोर जी एक word format सारखी चौकट दिसतेय त्याच्या वरच्य बाजूला आडव्या स्वरुपात विविध option दिसत आहेत .त्यापैकी link एक option आहे त्यवर click केल्यास.एक छोटी विंडो open होईल. त्यात दोन box दिसतील
    पहील्या box मध्ये आपण खालच्या दुसर्य box मध्ये कशाची लींक देतोय ते ईथे लिहा.
    व खालच्या दुसर्या box मध्ये आपण copy करुन आणलेली link paste करा..
    खाली ok म्हणा..

    ती लिक आपल्या पेजच्या word सारख्या दिसणार्या window मध्ये दिसेल.
    बाजुला च save/publish/save arrangement जे असेल त्यावार click करा.

    🔴स्टेप 9
    drive ला फाईल अपलोड करुन लिंक देणे
    ------------------------------------------------
    आता हि ब्लाँग ला दिलेली लिंक copy करुन कुठुन आणायची..

    आपल्य browser मध्ये goigle drive टाईप करा.
    id / password देऊन लाँगिन व्हा.डाव्या बाजूला new आशी लाल टँब दिसेल तिथुन हवे ते ( vdo,mp3.image अपलोड करा.लिंक शेअरेबला करुन copy करुन blog ला जीथे आपण स्टेप 8 मध्ये शिकलो तशी पेस्ट करा.drive,बरोबरच YouTube,किवा ईतर कुठल्याही लिंक आपण देऊ शकतो..

    🔴ईथे आपण drive ला फाईल कशी आपलोड करायची हे ही
    शिकलात)

    ✍🏻✍🏻 श्री. दत्ता आम्रीत पाटील✍🏻✍🏻
    9403063822

    ReplyDelete
  6. ब्लॉगमध्ये पळणारी किंवा हलणारी अक्षरे निर्माण करण्यासाठी
    http://www.bloggertricks.com/2007/12/scrolling-text-marquee-html-codes-for.html?m=1

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता