आइन्स्टाइन. सर्वात जास्त
बुद्ध्यांक असलेला शास्त्रज्ञ. आपल्याला नाव तरी किमान माहिती असलंच हे. पण कधी
विचार केला आहे का की आइन्स्टाइन कसा विचार करत असेल? त्याला नव्या नव्या कल्पना कशा सुचत असतील?
प्रश्न भारी आहे ना,
त्याचं उत्तर तुम्हाला या लेखात सापडू शकेल.
आइन्स्टाइन कायम म्हणायचा,
मला शिस्तबद्ध विचार करून कोणतंच कोडं सुटलं
नाही. मी माझ्या सर्व प्रेरणा बाहेरच्या जगातून घेत असतो.
त्याच्या कामामधून
मुद्दाम वेळ काढून तो अनेकवेळा व्हायोलीन वाजवायला जायचा. त्याच्या सुरांमध्ये
अनेक कोड्यांची उत्तरे त्याला सापडली असं तो म्हणतो. संगीताबरोबर त्याला चालायला
जायची आवडही होती. किती व्यग्र दिवस असला तरीही तो रोज, न चुकता जेवण झालं की बाहेर फिरायला जायचा.
पक्ष्यांचा आवाज ऐकायला
त्याला फार आवडायचं. त्याच्या मते हा त्याच्यासाठी ‘फावला वेळ’ नसून कामाच्या
मध्येच किंवा कामाच्या प्रक्रि येचाच एक भाग होता. तो फिरायला बाहेर गेला नसता तर
त्याला रिलेटिव्हिटीचा शोध लागला नसता असं तो म्हणतो.
एखादा विचार आपल्या
डोक्यात सतत शिजत असला तर जरी आपण प्रत्यक्ष त्याचा विचार करत नसलो तरीही आपलं
अंतर्मन त्याचा विचार चालू ठेवत असतं. मग जेव्हा आपले मन, बुद्धी नेहमीच्या गोष्टी करत नसते. काही सवयीच्या गोष्टी
करत नसते तेव्हा आपल्याला अधिक चांगल्या गोष्टी सुचतात.
आइन्स्टाइन कसा विचार
करायचा, त्याच्या कामाची पद्धत
काय, हे जाणून घेऊन आपण आपलं
काम कसं करू शकतो, कशा कल्पनाच खेळ करू शकतो
हे नक्कीच शिकू शकतो!
त्यासाठी वाचा हा लेख- https://blog.evernote.com/blog/2017/01/11/albert-einstein-approach-to-thinking/
डान्सर इंजिनिअर
गेल्या आठवड्यात आयआयटी
रुकरीच्या इंजिनिअर्सनी एकदम तोडून टाकलं इंटरनेट. पार ब्रेक केलं हो...
आयआयटीवाले म्हणजे
पुस्तकी किडे. एकीकडे असं एक आपलं टिपिकल इमेजवालं मत.
पण आयआयटी रुकरीच्या तरुण
इंजिनिअर्सनी एक डान्सिंग व्हिडीओ टाकला व्हॅलेण्टाइन डेच्या निमित्तानं यू
ट्यूबवर. तर त्यानं फक्त सहाच दिवसांत २ कोटी ८० लाखांहून हिट्स कमावले.
व्हॅलेण्टाइन डे जवळ आलेला आणि हे बिचारे चार इंजिनिअर एका मुलीला इम्प्रेस
करण्याच्या प्रयत्नात. गातात. नाचतात. ‘शेप आॅफ यू’ हे ते गाणं. मात्र या चार
इंजिनिअर्सनी जो काही अफलातून डान्स केला आहे या गाण्यावर. त्यांच्याच कॉलेजात
त्याची कोरिओग्राफी झाली.
आणि यू ट्यूबवर टाकताच
तरुण जगात त्या व्हिडीओनं खळबळ उडवली. पहायलाच हवा असा हा एक चर्चेतला व्हिडीओ
आहे...https://www.youtube.com/watch?list=RDdTMLTCJzYGM&v=dTMLTCJzYGM
(- प्रज्ञा शिदोरे pradnya.shidore@gmail.com
)
No comments:
Post a Comment
खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता