Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Monday 27 March 2017

गुढी पाडवा......समज - गैरसमज...

बऱ्याच  जणांचा असा गैरसमज असतो कि "स्वराज्याचे दुसरे छत्रपति शंभूराजे यांची हत्या या दिवशी झाली आणि म्हणून ब्राह्मणांनी गुढी उभारणे चालू केले. आणि म्हणून या दिवशी कोणीही नवीन वर्ष साजरे करू नये."
परंतु हे सर्व निखालस खोटे आहे, यातील प्रत्येक शब्द हा असत्याने आणि द्वेषाने भरलेला आहे.
आता आपण गुढी पाडव्यामागील सत्य जाणून घेऊया.
गुढीपाडव्याचा सर्वात जुना उल्लेख हा शालिवाहन म्हणजेच सातवाहन याच्या काळातील. याने परकीय शकांचा पाडाव केला आणि जनतेचे राज्य स्थापन केले. याच दिवशी त्याने आपल्या राज्याचा नवीन शक चालू केला जो आजतागायत चालू आहे. आणि शिवकाळातही याच शकाच्या आधाराने सर्व नोंदी केलेल्या आहेत.
सातवाहनाची राजधानी होती प्रतिष्ठाण म्हणजे महाराष्ट्रातील पैठण. सातवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता.
तर अशा या सातवाहनाने ज्या दिवशी नवीन शक चालू केला तो दिवस संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकातही गुढी पाडवा या नावाने साजरा केला जातो. म्हणजेच या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. सातवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता.
जे कार्य छत्रपति शिवरायांनी परकीय मोगलांना हरवून केले तेच कार्य सातवाहनाने पहिल्या शतकात केले आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिले साम्राज्य स्थापन केले. याच दिवशी सातवाहनाने परकीय शकांना धूळ चारली आणि महाराष्ट्र भूमी स्वतंत्र केली.

गुढी पाडव्याचा दुसरा उल्लेख मिळतो तो छत्रपति शंभूराजांच्या काळात.
मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे दुर्दैव असे कि शंभूराजांना खुद्द त्यांच्या मेहुण्याने, गण्या शिर्के याने फितुरी करून त्यांना औरंगजेबाच्या स्वाधीन केले. औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ केला, परंतु जवळजवळ दीड महिना जिवंत ठेवले. याचेदेखील कारण म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी स्वराज्यातील सर्व जनता नवीन वर्ष साजरे करत असे. त्यांना खिजवण्यासाठी हलकट औरंगजेबाने गुढी पाडव्याच्या ठीक आदल्या दिवशी महाराजांची हत्या केली आणि गुढी पाडव्याच्या दिवशी त्यांचे शीर भाल्याच्या टोकाला लटकावून अत्यंत क्रूर असे प्रदर्शन केले.

आता या सर्व घटनांत ब्राह्मणांचा संबंध कोठे येतो...???
सातवाहन हा एका कुंभाराचा मुलगा होता तरीसुद्धा त्याचा विजयदिवस म्हणून ब्राह्मणदेखील गुढी पाडवा साजरा करतात. येथे जाती भेदाचा संबंधच नाही. त्याने चालू केलेल्या शकाचा वापर आज ब्राह्मण लोकच जास्त करताना दिसतात. जर इथे ब्राह्मणी कावा दिसला असता तर असे झाले असते का...???

छत्रपति शंभूराजांच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्याच्यावर सर्वांनीच अन्याय केला.
फक्त २००० सैनिकांनी शंभूराजांना पकडले होते आणि ते चक्क पंधरा दिवस स्वराज्यातून प्रवास करून औरंगजेबाकडे पोहोचले. यादरम्यान कितीतरी गडकिल्ले होते उदा. पन्हाळा, परंतु त्यांच्या सुटकेसाठी एकही हल्ला झाला नाही हि काय ब्राह्मणांची चूक आहे का?
त्यांना पकडल्यावर लगेचच सात दिवसात राजाराम महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तरीही एकही दूत औरंगजेबाकडे रवाना केला गेला नाही यात ब्राह्मणांचा दोष आहे का?
संगमेश्वर येथे लढाईत त्यांना एकटे सोडून जवळजवळ सर्वच मराठा सैनिक पळून गेले, यात संताजी घोरपडे सारखा सेनापतीदेखील होता, यात ब्राह्मणांची काय चूक आहे.

उलट एक ब्राह्मण व्यक्ती कवी कलश हेच अंतिम समयापर्यंत त्यांच्या सोबत होते आणि खुद्द औरंगजेबाच्या समोर त्यांनी शंभूराजांची तारीफ एका काव्यातून केली.  यासाठी औरंगजेबाने त्यांची जीभ कापली.

हा सर्व लेख वाचल्यानंतर जे दोन गैरसमज मी वर सांगितले आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध होते.
म्हणजेच शंभूराजांची हत्या हि गुढी पाडव्याला झालेली नसून त्याच्या आदल्या दिवशी झालेली आहे, आणि गुढी पाडवा हा फक्त ब्राह्मणांचा सण नसून तो जनतेने त्यांच्या राजाविषयी असलेल्या प्रेमापोटी साजरा केलेला सण आहे.
तेव्हा समाजात ब्राह्मणांच्या विरुद्ध विखारी प्रचार करण्यासाठी खोटा इतिहास लिहून जो मूर्खपणा काही मंडळी करत आहेत तेच खरे शिवद्रोही आहेत.

द्वारा पोस्ट केलेले Vighnhaari vighnharta येथे २:५९ म.उ.
http://vighnharta.blogspot.in/2013/01/blog-post_6.html



गुढीपाडवा ( Gudhi padava ) - चैत्र हा हिंदूच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना आणि पहिल्या महिन्यातला पहिला सण म्हणजे " गुढीपाडवा ". ह्या दिवशी पासून नवीन मराठी वर्षाला सुरुवात होते. ह्या दिवशी बांबूची उंच काठी रेशमी खणाने किंवा वस्त्राने रेशमी साडीने सजवतात. त्यावर चांदीचे किंवा तांब्या - पितळेचे पात्र ठेवले जाते. हारगाठीकडूलिंबाची डहाळी त्याला लावली जाते. अश्या तयार केलेल्या गुढीची पूजा करतात आणि ती अंगणात ( सध्याअंगण राहिले नाही म्हणून ती खिडकीत किंवा टेरेस वर ) उभारली जाते. ह्या सणामागे एक कथा आहे ती अशी कि चेदी नावाचा एक देश होता. तेथें वसू नावाचा राजा राज्य करीत होता. मोठा गुणी आणि धार्मिक होता तो. त्याच्या राज्यात प्रजा सुखीसमाधानी होती. पण पूढे त्याच्या मनात विरक्तीचे विचार आले. त्याने राजवाडा सोडलाराज्य सोडलेआणि तो अरण्यात गेला व तपश्चर्या करू लागला. त्याची घोर तपश्चर्या पाहून देव प्रसन्न झाला. त्याने राजाला वैजयंतीमाळाविमान आणि वेळूची एक काठी दिली आणि सांगितले ," राजापरत आपल्या राज्यात जासुखाने राज्य कर. प्रजेला सुखी ठेव. ही पूजाच मला आवडेल. आपले कर्तव्य मन लावून करणे प्रामाणिकपणे करणेहीच परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा आपले कर्तव्य कर ! ". परमेश्वराच्या कृपेने राजाला आनंद झाला. त्यांची आज्ञा मानून तो आपल्या राज्यात आला. परमेश्वर प्रसन्न होऊन राजाला प्रसाद दिला त्या दिवसाची आठवण ठेवण्याकरिता राजाने त्या वेळूच्या काठीला सजविले तिची पूजा केली ती या दिवशी ! आणि तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला असे मानले जाते. गुढी पाडव्याच्या दिवशीच प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षाचा वनवास संपवून आयोध्याला परत आले. दुसरी कथा अशी की ह्याच दिवशी श्रीरामांनी बालीचा वध केला. आणि त्याच्या जाचातून प्रजेची सुटका केलीतीही ह्याच दिवशी! त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा पडलीअसे मानतात. ब्रम्हदेवाला सृष्टीची निर्मिती करावीशी वाटली आणि या कार्याला त्यांनी सुरुवात केलीतीही याच पवित्र दिवशी. गुढी पाडव्याला आपण साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त मानतो. मुहूर्त म्हणजे शुभ दिवस. ( हिंदू धर्मातील हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा एक. विजयादशमी किंवा दशहरा / दसरा एक. कार्तिक शुद्ध प्रतिप्रदा किंवा बलिप्रतिपदा - दिवाळीतला पाडवा एक आणि वैशाख शुद्ध तृतीया किंवा अक्षय्य तृतीया या सणाला अर्धा मुहूर्त मानतात ) गुढी पाडवा म्हणजे संवत्सर प्रतिपदा, ( संवत्सर म्हणजेच वर्ष ) वर्षाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाची सुरुवात ! पूर्वी पैठण येथे सात वाहनांचे - शाली वाहनांचे राज्य होते. त्या काळी शक म्हणजे परकीय सर्व राज्यात धुमाकूळ घालीत होतेप्रजेला छळत होते. शालिवाहनांनी शकांवर मिळविलेल्या विजयापासून हा शक सुरु झाला..

गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व खालील लिंक वर वाचा







No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता