Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 24 March 2017

तंत्रस्नेही प्रशिक्षण उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण : गुरूजी बनले तंत्रस्नेही


तंत्रस्नेही प्रशिक्षण उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

DIECPD BRC सेलू आयोजित  तंत्रस्नेही प्रशिक्षण प्रिन्स इंग्लिश स्कुल येथे संपन्न झाले. दोन दिवसीय प्रशिक्षणात १६२ शिक्षकांचा समावेश होता.
शिक्षकांनी व्हाट्सअप  लिंक द्वारे स्वत: ग्रुप मध्ये प्रवेश करून ग्रूप मध्ये आलेल्या लिंक द्वारे आपली ऑनलाइन उपस्थिती
नोंदविली
गूगल फॉर्म बनविणे , गूगल ड्राइव्ह चा वापर , टेस्टमोज या वेबसाईट वरुन ऑनलाइन टेस्ट बनवून विदयार्थीकडून कशी सोडवून घ्यायची याचे प्रात्यक्षिक प्रोजेक्टर वर ऑनलाइन दाखविण्यात आले, क्यू आर कोड ची निर्मिती कशी करायची व त्याचा शैक्षणिक व व्यवहारिक वापर स्मार्ट फोन वर  कसा करायचा याचे ही मार्ग प्रशिक्षणात सांगण्यात आले. यु ट्यूब वरील वीडियो डाउनलोड,अपलोड कसे करायचे तसेच स्वत:चे  चैनल निर्माण कसे करायचे या बाबी प्रशिक्षणार्थ्यानी आत्मसात केल्या. स्वत:चा जी मेल बनविने, पासवर्ड विसरल्यास तो रिकवर करने अशा बाबी शिक्षकांनी स्वत: प्रयत्न करून पाहिल्या .
या प्रशिक्षणाचे वैशिष्टय म्हणजे  शिक्षकांनी स्वत: सक्रीय सहभाग घेउन स्वत:चे ब्लॉग बनविले. ब्लॉग बनविताना येणाऱ्या अड़चनींवर सर्व मार्गदर्शकांच्या मदतीने प्रशिक्षणार्थ्यानी मात करून स्वत:चा ब्लॉग तयार करून त्यावर पोस्ट लिहिण्यास सुरुवात केली. वेबसाईट कशी बनवायची याचे ही मार्गदर्शन यात करन्यात आले. यासोबतच दैनंदिन जीवनात आवश्यक  अशा Apps ची माहिती सांगुन स्वत:चे app कसे बनवायचे हे ही या प्रशिक्षणात सांगण्यात आले.  तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री जयंत गाढे साहेब यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला व  सक्रीय सहभाग नोंदवून ब्लॉग निर्मितीसाठी प्रेरित केले.

प्रशिक्षणास मार्गदर्शक साधन व्यक्ति म्हणून श्री प्रविण कुलकर्णी , श्री विनायक सुरसे, फेरोज शेख व श्री शशिकांत जोशी यांची बी आर सी सेलू मार्फ़त निवड करन्यात आली. जिल्हास्तरावरुन प्रशिक्षित होउन त्यांनी तालुकास्तरावर हे प्रशिक्षण दिले. श्री राहुल उबाले यांनी सम्पूर्ण प्रशिक्षण व्यवस्था पाहिली.

मा.नंदकुमार साहेब, प्रधान सचिव  यांच्या प्रेरणेतून राज्यात तंत्रस्नेही शिक्षकांचा एक मोठा गट तयार होत आहे. त्यांच्या निर्देशानुसार शाळाशाळांतून संगणक क्रांती सुरु झाली आहे. शिक्षक Tech Savvy होत आहेत. आपल्या शाळेत माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने  अध्ययन - अध्यापन करणारे, तसेच इंटरनेटचे ज्ञान असणारे शिक्षक शोधण्याची मोहीम त्यांनी सुरु करून  www.technoteachers.in या वेबसाईटला जाऊन नोंदणी केल्यास मागेल त्याला प्रशिक्षण देण्याचे जाहिर केले. त्यानुसार सेलू तालुक्यातील १६२ शिक्षकांनी नोंदणी केली व  हे तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात आले.

https://goo.gl/PFg78I

2 comments:

  1. शशिकांत जोशी सर आपल्या कार्याला सलाम
    खूप छान ब्लॉग निर्मिती केली आहे ब्लॉग चे डीझाइन पण छान आहे

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर !

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता