Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 11 February 2016

प्रारब्धाचा हिशेब story



एक दिवस एक माणूस पूर्व सुचना न देता कामावर गेला नाही .
मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल .....
म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगारा व्यतिरीक्त त्याला पैसे वाढीव दिले ......
तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले .......
काही महिन्यानंतर परत तसच घडलं .... तो पुर्वसुचना न देता गैरहजर राहीला ...
मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला कि, याचा पगार वाढवून काय फायदा झाला ???
हा काही सुधारणार नाही .....
पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती पगार दिला .....
त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला .....
मालकाला खूप आश्चर्य वाटलं .
अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं , '' मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला ....तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस , आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहीलास म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला ....
तरीही तू काही बोलत नाही असं का ?????
त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं ..

''तो म्हणला , मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता ...... तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला .......
दुस-यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात ......
मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .
मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ??
ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ........

तात्पर्य -
जिवनांत काय मिळवलसं आणि काय गमावलसं असं जर कुणा विचारलं तर ,
बेलाशक सांगा , जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती देवाची कृपा होती.

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता