Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 15 July 2016

Skype चा वापर

 *skype* चा वापर
सौजन्य आनंद आनेमवाड

स्काईप हे असे एक सॉफ़्ट्वेअर आहे ज्याचा वापर करुन आपण जगातील इतर व्यक्तींशी संवाद साधू शकतो.  स्काईपचा वापर आपण ऑडियो व व्हिडिओ  कॉल करण्यासाठी करू शकतो. स्काईपच्या वापरासाठी आपल्याला ते सॉफ्टवेअर आपल्या संगणकावर कार्यान्वित करावे  लागते. ते आपण गूगल वरून डाउनलोड करू शकतो.

स्काईप चॅट, ऑडियो व व्हिडिओ कॉलची सेवा विनामूल्य पुरवते. स्काईपचा वापर करून खूप कमी दरात आंतर्राष्ट्रीय फ़ोन व sms ही करू शकतो. मात्र त्यासाठी स्काईप शुल्क आकारते.
ही सेवा वापरण्याचे प्रमुख कारण म्हणजे व्हॉईस क्वालिटी अतिशय चांगली असते.

स्काईपच्या वापरासाठी आवश्यक गोष्टी

🗝सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्काईपच्या वापरासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे

🗝ज्या व्यक्तीशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्या व्यक्तीचे स्काइपवर अकाउंट असणे आवश्यक आहे

तुमच्या संगणकावर स्काईप कार्यान्वित कसे कराल?

🌐१.  तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइलवर डबल क्लिक करा.

🌐२.  त्यानंतर सुचनांनुसार installation च्या पायऱ्या पूर्ण करा.

🌐३. त्यानंतर तो तुम्हाला तुमच्या स्काइप अकाउंट विषयी विचारेल त्यावेळी तुमचे अकाउंट तयार करण्यासाठी संपूर्ण फॉर्म भरा.


🌐४. जर तुह्मी निवडलेले स्काइपचे नाव उपलब्ध नसेल, तर स्काइप उपलब्ध असलेल्या नावांची यादी पुरवतो आपण त्यापैकी एक नाव निवडू शकतो.

🌐५. त्यानंतर आपल्याला आपली माहिती  भरावी लागते जसे की आपण रहात असलेले शहर ,देश इत्यादि .ही माहिती भरून झाल्यावर उजव्या कोपरयात असलेल्या Ok या बटनावर क्लिक करा.


🌐६. आता  तुमचे अकाउंट तयार झाले आहे .अकाउंट  तयार झाल्यानंतर तुमची स्क्रीन दिसेल.

📡स्काईप कसे वापराल ?

📡वर नमुद केल्याप्रमाणे ज्या व्यक्तीशी आपल्याला संवाद साधायचा आहे त्या व्यक्तीचे स्काईपवर अकाउंट असणे गरजेचे आहे, त्याचबरोबर  ती व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधे असणेही  गरजेचे आहे. त्यासाठी Contact या मेनूमधील Add Contact  हा  पर्याय निवडा.  
त्यानंतर विचारलेल्या महितीपैकी ई-मेल आयडी किंवा स्काईप युजर नेम लिहून add या बटनावर क्लिक करा. म्हणजे ती व्यक्टी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधे समाविष्ट होईल.

📡तुम्ही समाविष्ट केलेल्या व्यक्तिंची यादी डाव्या बाजूला दिसेल.

📡ज्या व्यक्तिशी तुम्हाला  संवाद साधायचा आहे ती व्यक्ती ऑनलाइन असणे आवश्यक आहे.

📡लिस्टमधील त्या व्यक्तीचे  नाव सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खालच्या बाजूला तुमचा मेसेज लिहिण्यासाठी जागा आहे. तिथे तुम्ही तुमचा मेसेज लिहून एंटर की दाबा. तो मेसेज संबंधीत व्यक्तीच्या तसेच तुमच्या  स्क्रीनवर दिसेल. त्याने दिलेले उत्तरही खालोखाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल . अशाप्रकारे तुह्मी एकमेकांशी संवाद साधू शकता. तुमचा संवाद खाली  तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Ⓜ🅰🅿 *ही उपयुक्त सुविधा नक्की वापरून पहा.*Ⓜ🅰🅿

⛔याचप्रकारे तुम्ही स्काईप वापरून  ऑडियो व व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल तसेच फ़ाइल शेअरिंग, स्क्रीन शेअरिंग करू शकता.

⛔खाली दिलेल्या स्काइपच्या कुठल्याही सुविधा वापरून आपल्याला ज्या व्यक्तीला संपर्क करायचा आहे ती व्यक्ती ऑनलाईन असणे  व  आपल्या संगणकाला माइकाची सुविधा असलेले headphones  असणे  गरजेचे आहे.

⛔ऑडियो व व्हिडीओ  कॉल
स्काइपचा  वापर करून आपण ऑडियो व  व्हिडीओ कॉल करू शकतो.

⛔ज्या व्यक्तीला आपल्याला कॉल करायचा आहे त्या व्यक्तीचे नाव आपल्या संपर्क यादीमधून निवडायचे.  नाव निवडल्यानंतर उजव्या बाजूच्या स्क्रीनवर call असे बटण दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुमचा कॉल सुरु होईल.

⛔कॉल बंद करण्यासाठी End call या बटणावर क्लिक करा.

⛔व्हिडीओ कॉल करण्यासाठी Video call या बटणावर क्लिक करा. यासाठी आपल्या संगणकावर वेब कॅम असणे गरजेचे आहे.

⛔👬समूह  कॉल (conference call )
कॉन्फरन्स कॉलचा वापर करून  आपण  एकाचवेळी अनेक व्यक्तींशी संवाद साधु शकतो.  त्यासाठी add people या बटणावर क्लिक करा.

👬तुह्माला हवी असलेल्या व्यक्तींची नावे संपर्क यादीतून निवडा व select या बटणावर क्लिक करा. आता तुह्माला ज्या व्यक्तींशी बोलायचं आहे त्या व्यक्तींची यादी तयार झाली. त्यानंतर add या बटणावर क्लिक करा.

👬📡 त्यावरील Call group या बटणावर क्लिक करा.


Ⓜ🅰🅿अशाप्रकारे  तुह्मी एकाच वेळी अनेक व्यक्तींशी संवाद साधु शकता.Ⓜ🅰🅿

👬⛔समूह चर्चा (conference chat )

समूह कॉलप्रमाणेच तुह्मी समूह चर्चा करू शकता.त्यासाठी वर दिल्याप्रमाणे ज्या व्यक्तींशी चर्चा करायची आहे त्या व्यक्तींना समाविष्ट (add ) करा आणि उजव्या बाजूला असलेल्या विंडोवर लिहायला (chat ) सुरवात करा. अशाप्रकारे तुह्मी एकाचवेळी अधिक व्यक्तींशी संवाद (chat ) साधु शकता.

🗂फाइलची देवाणघेवाण ( file transfer )

स्काइपचा वापर करून आपण एखाद्याला आपल्या संगणकावरील  फाइल पाठवू शकतो. त्यासाठी  संपर्क यादी मधून त्या व्यक्तीचे नाव निवडा व उजव्या बाजूला असलेल्या स्क्रीनवरील send file या पर्यायावर क्लिक करा.


🗂त्यानंतर तुह्माला पाठवायची असलेली फाइल निवडा व  Open या बटणावर क्लिक करा.
आता आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून फाइल घ्यायची असेल तर त्या व्यक्तीने फाइल पाठवल्यावर आपल्याला save file व cancel असे दोन पर्याय दिसतील त्यातील save file ह्या पर्यायावर क्लिक करा

🗂फाइल जतन(save) करण्यासाठी  ती आधी स्वीकारावी लागते त्यासाठी OK या बटणावर क्लिक करा.

🗂त्यानंतर ती फाइल आपल्याला कुठे जतन (save) करून ठेवायची आहे ती जागा निवडा व save या बटणावर क्लिक करा.

🗂म्हणजे आता ती फाइल आपल्या संगणकावर जतन(save) झाली.

⛔अशाप्रकारे दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरू शकणाऱ्या विविध सेवा स्काइप आपल्याला उपलब्ध करून देते.⛔
           ⛔Ⓜ🅰🅿⛔
*पुढील भागात पाहू skype चा शैक्षणिक उपयोग education.skype*
        ⛔Ⓜ🅰🅿⛔

⛔ *संकलन व लेखन*-

 🅰nand 🅰nemwad

📞9890697966

⛔🗂📡🌐Ⓜ🅰🅿🌐📡🗂⛔

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता