Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Wednesday 30 November 2016

संगणकद्वारे व्हिडीओ निर्मीती

आज संगणक द्वारे सोप्या पद्धतीने शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कशी तयार करता येईल याची माहिती घेऊयात.तस  तर व्हिडीओ निर्मितीसाठी  खूप software आहेत.

Camtasia 8.6 Studio


सहज व सोप्या पद्धतीने व्हिडिओ निर्मिती साठी :-

1)Power Point Presention मधून स्लाइड्स (PPT) तयार करता याव्यात.

2)आपल्या pc/लॅपटॉप मध्ये Camtasia 8.4 Studio हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल हवे.

3)आवाज रेकॉर्डिंग साठी माईक/हेडफोन विथ माईक हवा.

वरील बाबी असतील तर खूप सोप्या पद्धतीने व्हिडिओ आकर्षक असा व्हिडिओ तयार करता येईल.

1) प्रथम Power Point मधून ज्या घटकावर आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे, त्या घटकाच्या आकर्षक slide तयार करा.

2) तयार केलेल्या slide मधील शब्द व इमेज यांना आकर्षक अनिमेशन द्या.
लक्षात असुद्या फक्त animation द्या, Transitions देऊ नका. आणि Slide Transitions मध्ये On Mouse Click वर चेक मार्क असुद्या.

3)आपण पूर्वीच आपल्या pc मध्ये Camtasia 8 install केले असल्यामुळे
Power Point मध्ये ADD-INS नावाचा एक नवीन टॅब ऍड झालेला आहे, त्यावर क्लिक करा.

4)आता डाव्या बाजूला असलेल्या record वर क्लीक करा, उजव्या कोपऱ्यात click to begin recording वर क्लीक करा.

5)Ppt प्ले होईल, स्क्रीन वर एक एक शब्द ,इमेज व पुढील स्लाईड येण्यासाठी माऊस क्लीक किंवा नेक्स्ट ऍरो कि प्रेस करा. या वेळी इमेज ,शब्द नुसार माईक द्वारे आपला आवाज रेकॉर्ड करा.

6)पूर्ण स्लाईड रेकॉर्ड करून झाल्यानंतर तयार झालेला व्हिडिओ सेव्ह करा.

7) आता Camtasia Studio for Powerpoint नावच पेज येईल त्यातील Edit Your Recording वर चेक मार्क करून ok करा.

8)तयार व्हिडिओ Camtasia स्टुडिओ ओपन होईल.

9)आता येथून व्हिडिओ एडिट करता येईल.
बॅकग्राऊंड संगीत, आवाज , स्पीड, स्टिकर ,नको असलेला कट करता इत्यादी बाबी करता येतील व प्ले करून पाहता येतील.

10) पाहिजे असा तयार झाल्या नंतर वरील Produce And Share वर क्लीक करून हव्या त्या फॉरमॅट मध्ये आपला नवीन व्हिडिओ export करा व सेव्ह करा.

अशा प्रकारे power point रेकॉर्ड करून सोप्या पद्दतीने व्हिडिओ तयार करू शकतो. तर मग लगेच आपला स्वतः चा सुंदर असा व्हिडिओ तयार करा व share करा आणि इतरांनाही व्हिडिओ तयार करण्यासाठी माहिती share करा.

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता