जेव्हा तुम्हाला वर्ल्ड किंवा एक्सेल ची फाईल PDF मध्ये हवी असेल तेव्हा तुम्ही काय करता? यासाठी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत.पण doPDF हा काहिसा वेगळा आहे. doPDF हे एक छोटेसे सॉफ्टवेअर आहे, जे खाजगी आणि व्यावसाईक कामांसाठी अगदी मोफत वापरता येते. यात अतिशय सोप्या पध्दतीने कोणतीही वर्ल्ड किंवा एक्सेलची फाईल सर्च करता येऊ शकेल अश्या PDF मध्ये कनर्व्हर्ट करता येते. जेव्हा आपण हा प्रोग्रॅम इन्स्टॉल करतो तेव्हा प्रिंटरच्या यादीत हा सुध्दा एक प्रिंटर म्हणून येतो. आता जेव्हा आपल्याला ज्या फाईलचे PDF करावयाचे असेल त्या फाईल मध्ये प्रिंट कमांड दयावी आणि हा प्रिंटर सिलेक्ट करावा. नंतर हि PDF फाईल कोठे सेव्ह करायची आहे, तो पाथ दयावा. doPDF मध्ये पुढील पैकी कोणतीही फाईल PDF मध्ये कनर्व्हर्ट करता येते उदा. DOC, XLS, PPT, PUB, DOCX, XLSX, PPTX, PUBX, HTML, TXT इ.तसेच यात अनेक वैशिष्टे आहेत जसे हा : A4, A5, A6 आणि custom अश्या पेजेसची साईज मध्ये PDF करता येते, मुळ स्वरुपाच्या फाईलची साईज 1% ने कमी करता येते आणि 400% ने वाढवता येते, इमेजेसचा रिझोल्युशन 72 ते 2400 dpi ठरवता यतो तसेच पेजचा orientation ठरवाता येतो आणि अजून खुप काही.
https://drive.google.com/file/d/0ByAeWp8YuuOBVzBWaDA4b2VsR1E/view?usp=drivesdk
No comments:
Post a Comment
खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता