Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 11 November 2018

व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलंय? असं करा स्वत:ला अनब्लॉक

ⓢⓟⓙ
*व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलंय?*📵 *असं करा स्वत:ला अनब्लॉक* 🚫
➖➖➖➖➖➖➖➖
*🚸 चळवळ तंत्रज्ञानाची 📽*
     _"पोस्ट तुमच्या कामाची"_
        🔅 पोस्ट क्र.01 🔅
               Ⓜ🅰🅿
====================

व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय माध्यम आहे. एकमेकांशी पटकन कनेक्ट होण्याकरता या अॅपचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. मात्र एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की आपण लगेच त्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक करण्याचा निर्णय घेतो. मात्र ब्लॉक केलेलं असल्यास एकमेकांशी संवाद साधता येत नाही. अनब्लॉक केल्यावरच गप्पा मारणं अथवा चॅट करणं शक्य असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास स्वत:ला अनब्लॉक कसं करायचं हे जाणून घेऊया.

सर्वप्रथम तुमच्या मित्राने अथवा मैत्रिणीने तुम्हाला नक्की ब्लॉक केलंय का हे पाहा. साधारण एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असल्यास त्या व्यक्तीचा डीपी, स्टेटस, लास्ट सीन असं काहीच दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला जर हे दिसत नसेल तर नक्कीच तुम्हाला ब्लॉक केलं आहे. याशिवाय आणखी एक पद्धत आहे ज्याच्यामुळे तुम्हाला खरंच समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का ते समजणार आहे. यासाठी तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज पाठवा. जर एकच टिक दिसत असेल तर तुम्हाला ब्लॉक केलं आहे हे समजा.

आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केल्यास असं करा स्वत: ला अनब्लॉक

- सर्वप्रथम व्हॉट्सअॅपच्या सेटींगमध्ये जा आणि व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करा.

- व्हॉट्सअॅप अकाऊंट डिलीट करण्यासाठी डिलीट माय अकाऊंटवर क्लिक करा आणि नंतर आपला मोबाईल नंबर टाका.

- मोबाईल नंबर देऊन अकाऊंट डिलीट करा आणि नंतर व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा.

- अनइन्स्टॉल केल्यावर फोन एकदा रिस्टार्ट करा.

- प्ले स्टोअरवर जाऊन पुन्हा एकदा नव्याने व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा आणि पूर्ण माहिती द्या.

- यानंतर तुम्हाला ब्लॉक केलेल्या अकाऊंटने तुम्हाला अनब्लॉक केल्याचं दिसेल.

*एस.पी.जोशी*
www.espjoshi.blogspot.in
*┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता