Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 12 July 2019

गरीबांच्या मुलांचे Premium Teacher व्हा !


Super30 चित्रपटाचा अप्रतिम संदेश
#प्रत्येक ZP शिक्षकाने पहावा असा चित्रपट !!!

Super 30 चित्रपटाचा First day First Show पाहण्याचा योग आला, त्यानिमित्ताने
चित्रपटातील एका डायलॉगला प्रेरित होऊन एक छोटासा लेख लिहून आपल्यासमोर ठेवत आहे.
तो डायलॉग
*"अमीरों के बच्चों के लिए Premium Teacher होते है और गरीबों के लिए Assistant Teacher"*

          श्रीमंतांची मुले पाच-पाच आकडी  फीस भरून मोठमोठ्या इंग्लिश स्कूल, खाजगी शाळेत शिकतात. त्यांना शिकविन्यासाठी केरळ, उड़ीसा सारख्या राज्यातील premium शिक्षक नियुक्त केले जातात व याउलट
गरीबांची मुले जिल्हा परिषदांच्या शाळेत डीएड झालेल्या Assistant Teachers कडून मोफत* शिक्षण घेतात.
जिल्हा परिषद शिक्षकांचा विद्यार्थी ही भविष्यात या Premium शिक्षकांच्या विद्यार्थ्यांसमोर ताठ मानेने उभा राहुन स्पर्धेत टिकायला हवा, असाच काहीसा संदेश हा चित्रपट देऊन जातो.

प्रत्येक जिल्हा परिषद शिक्षकात एक आनंद कुमार नक्कीच आहे !
यश संपादित करन्याइतपत क्षमता त्यात आपण निर्माण करायलाच हवी.

*ज्ञानाचे उपयोजन* कसे होते याचा प्रत्यय घेण्यासाठी आवर्जून पहावा असा चित्रपट !
चित्रपटात *गरीबी व शिक्षण* याचे अप्रतिम चित्रण करण्यात आले आहे, काही दृश्य खूपच अप्रतिम रेखाटली आहेत त्यांचा आस्वाद थिएटर मध्ये जाऊन पाहन्यातच आहे.

*Super30*
आपल्या जवळच्या सिनेमागृहात,
प्रत्येक शिक्षकाच्या प्रतिक्षेत
क्योंकि
*" अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा."*


शशिकांत जोशी
एक जिल्हा परिषद शिक्षक
spjoshi21@gmail.com
https://tinyurl.com/premiumteacher
➖➖➖➖➖➖➖➖

2 comments:

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता