Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 24 September 2016

।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।


दिला एकदा शब्द न पालटावा। पुढे टाकला पाय मागे न घ्यावा ।।
धरें जो स्वयंभू शिवाजीपथाला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१।।
कधीँ शत्रूचे घाव ना पाठीवरती ।
रणीं झेलतो सिंहसा धातीवरती ।।
हाकारुनी आव्हानतो जो यमाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२।।
जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल ।
तिला साडीचोळीनिशीं पाठवील ।।
कधीं स्वप्नीँ ना पाप स्पर्शेमनाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३।।
महावादळांच्या विरोधांत ठाके।
पुढें संकटांच्या कधीं हि न वाके ।।
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला ।
मराठे म्हणावे अशा वाघराला ।।४।।
मनीं धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा ।
उरीं देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा।।
सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रुवाला ।
मराठा म्हाणावे अशा वाघराला ।।५।।
दमे ना थके ना झुके ना हटे ना ।
कधीं हिन्दवीराज्यमार्गीँ चळे ना ।।
निराशा न स्पर्शेकधीं हि उराला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६।।
खडे सैन्य घेई अटकपार जाई।
जिथें म्लेंच्छ भेटे तिथेँ सूड घेई।।
सदा धाव ज्याची असे उत्तरेला।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।७।।
पुरा ठार मारावया शाहिस्त्याला ।
घुसुन लालमहालीं करे खड्गहल्ला ।।
भिती स्वप्नीं ना स्पर्शते काळजाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।८।।
आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला ।
मुलाचे त्यजून धाव घेई गडाला ।।
स्वतःच्याहुनी मायभू श्रेष्ठ ज्याला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।९।।
निखार्यातुनी हासत चालणारा।
विना ढाल हि शत्रूशी झुंझणारा।।
भितो म्रत्यु हि स्पर्श करण्या जयाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१०।।
कुणी वीट मारे दगड हेच उत्तर ।
दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर ।।
स्वये होई वणवा गिळाया आगीला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।११।।
घणाघात घालू मुघलतख्त फोडू ।
पुरे जाळुनी राख पाताळी गाडू।।
अटकपार सूडार्थ आसूसलेला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१२।।
फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभूंना ।
तसा चित्तीँ ध्यातो शिवा काशिदाना ।।
सदा सिध्द त्रयीवत तनु झोपण्याला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१३।।
शिवा काशिदांचा असामान्य त्याग ।
मला हि असा लाभू दे कर्मयोग।।
असे मागतो नित्य तुळजापदाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१४।।
कुणी क्रुर भेटे बने लक्ष क्रुर ।
त्वरे मारतो पोट फाडूनी ठार।।
शिवाजी जसें फाडिती अफझल्याला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१५।।


No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता