Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 16 September 2016

IGNOU बी.एड. प्रवेशप्रक्रियेत झाले बदल


IGNOU बी.एड. प्रवेश 2016- 17


    

1) NCTE च्या निर्देशानुसार प्रवेश क्षमता कमी करण्यात आलेली असून नागपूर विभागीय केंद्राअंतर्गत मागच्या वर्षी पर्यंत 900 जागा होत्या त्या आता 50 टक्के ने कमी होउन 450 एवढ्या झाल्या आहेत.पुणे विभागीय केंद्राअंतर्गत सुद्धा अशीच अवस्था आहे.
2) नागपूर विभागीय केंद्राअंतर्गत पुर्वीच्या 9 पैकी 3 अभ्यासकेंद्र बंद करण्यात आले असून सध्या 6 अभ्यासकेंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे.पुर्वीचे नांदेड ,वर्धा व सिंदखेड राजा ही अभ्यासकेंद्रे बंद करण्यात आली आहेत.
3) नागपूर विभागीय केंद्राअंतर्गत अभ्यास केंद्रांची प्रवेश क्षमता पुर्वी 100 होती ती आता 75 करण्यात आली आहे.
4) पुणे विभागीय केंद्राअंतर्गत अभ्यासकेंद्रांची प्रवेश क्षमता पूर्वी 100 होती ती आता 50 करण्यात आली आहे.
5) NCTE च्या निर्देशांनुसार इग्नू बी एड.अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रते मध्ये बदल करण्यात आला असून सेवेत प्रवेश करण्यापुर्वी केलेले डी.एड/समकक्ष . हा अभ्यासक्रम face to face mode म्हणजेच regular मध्ये पुर्ण केलेला असणे आवश्यक आहे.याचाच अर्थ असा की पत्रद्वारा डी.एड. केलेल्या वस्ती शाळा शिक्षकांचा व अप्रशिक्षित शिक्षणसेवकांचा इग्नु मध्ये बी.एड. करण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे.
या वर्षी प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरु होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यासक्रमात झालेला बदल हे आहे. regular बी.एड. चा कालावधी 2 वर्षांचा झालेला असल्यामुळे दूरशिक्षण बी. एड.च्या कालावधी सुद्धा वाढणे अपेक्षित होते परंतु इग्नू विद्यापीठाने तसे न करता अभ्यासक्रमात बदल केलेला आहे, तो पुढील प्रमाणे
1) पुर्वी प्रथम वर्षासाठी प्रत्येकी 4 भारांशाचे 3 विषय अनिवार्य व दोन अध्यापन पद्धतींचे प्रत्येकी प्रत्येकी 4 भारांशाचे दोन विषय वैकल्पिक असे एकूण 5 विषय होते .आता 4 भारांशाचे तीन व 2 भारांशाचे 2 असे 16 भारांशाचे 5 विषय अनिवार्य व दोन अध्यापन पद्धतींचे 4 भारांशाचे दोन विषय वैकल्पिक असे बदल झले आहेत.
2) विषयांच्या नावा मध्ये बदल झालेला आहे उदा. teaching of hindi एवजी PADAGOGY OF HINDI.
3) नवीन अभ्यासक्रम संरचनेत INTERNSHIP हा नवीन प्रकार लागू झालेला असून याबद्दल prospectus मध्ये काहिही माहिती दिलेली नाही,परंतू एकुण स्वरुपावरुन आपण प्रवेश घेताना जी माध्यमिक शाळा कृती कार्यासाठी निवडलेली आहे त्या शाळेवरच हे INTERNSHIP पुर्ण करावयाचे आहे हे लक्षात येईल .
1) प्रथम व द्वितिय यादीतील प्रवेशासाठी पात्र म्हणजेच द्वितिय यादीतील cutoff गुणां पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या परिक्षार्थ्यांना यापुर्वीच प्रवेश समुपदेशनासाठी पत्रे व प्रवेश फॉर्म पोस्टाने मिळालेले  आहेत नागपूर विभागीय केंद्राची cutoff list व प्रवेश समुपदेशन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.इतर विभागीय केंद्रांची cutoff list व वेळापत्रके पेजच्या शेवटी दिली आहेत.
2) आपण ज्या प्रवर्गातून परिक्षा दिली आहे त्या प्रवर्गाच्या cutoff गुणांपेक्षा जास्त गुण आपणांस प्राप्त असतील व आपणास विद्यापीठाचे पत्र जरी मिळाले नसेल तर येथे क्लिक करा व आवश्यक कागद्पत्रे डाऊनलोड करुन घ्या व व्यवस्थित भरुन , वरील वेळापत्रकात दर्शविलेल्या तारखेला इग्नू विभागीय केंद्रावर प्रवेशासाठी हजर राहा.
 3) मुंबई विभागीय केंद्रातर्फे पाठविलेल्या offer letter मध्ये Authentication letter हा फॉर्म दिलेला असून हे  प्रमाणपत्र आपणांस डीएड. चे प्रमाणपत्र ज्या संस्थेने अथवा विद्यापीठाने दिलेले आहे त्यांचे कडून भरून घ्यावे लागेल उदा. 'महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे' (MSCE PUNE).नागपूर व पूणे विभागीय केंद्रातर्फे पाठविलेल्या offer letter मध्ये हा फॉर्म दिलेला नाही परंतू IGNOU DELHI ने मुख्य वेबसाईट वर दिलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या यादी मध्ये हा फॉर्म दिलेला असल्यामुळे नागपूर व पुणे विभागीय केंद्रावर प्रवेशासाठी जाणा-यांनी या बद्दल विभागीय केंद्रावर अधिक चौकशी करावी ,म्हणजे एनवेळी धावपळ होणार नाही.
4)आपण ज्या हॉल तिकिट वर प्रवेश परीक्षा दिलेलीआहे ते ओरिजिनल हॉल तिकिट Acceptance form सोबत जोडा. प्रवेश परिक्षेचा फॉर्म भरतांना आपण आपला Service experience दाखविलेला आहे परंतू नागपूर विभागीय केंद्रातर्फे पाठविलेल्या acceptance form मध्ये service experience certificate दिलेले नाहि . बी. एड. prospectus 2016 मध्ये ते प्रमाणपत्र दिलेले असून प्रवेशाच्या वेळी acceptance form सोबत जोडण्यास सांगीतले
आहे . हे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
5) आपली निवड राखीव प्रवर्गातून (SC,ST,OBC) झालेली असल्यास प्रवेशाच्या वेळी आपणांस त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्र. पत्र सादर करावे लागेल, OBC प्रवर्गातून निवड झालेली असल्यास वरील दोन कागद्पत्रां शिवाय नॉनक्रिमिलेयर प्र.पत्र सादर करावे लागेल हे लक्षात असू द्या.आपल्या निवडीचा प्रवर्ग आपणास मिळालेल्या offer letter च्या पाकिटावर आपला पत्ता लिहिलेल्या Address label वर सर्वात खाली लिहिलेला आहे.आपण प्रवेश परिक्षेच्या फॉर्म वर SC/ST/OBC प्रवर्ग नोंदवलेला असेल व मार्कलिस्ट वरही तो प्रवर्ग दाखविलेला असेल तरिही आपल्या Address label वर त्या प्रवर्गाचा उल्लेख नसल्यास आपली निवड GENERAL मध्ये झाली आहे असे समजावे,अशा प्रकारे निवड झाल्यास प्रवेशासाठी प्रवर्गाचे कोणतेही कागद्पत्रे सादर करावी लागणार नाहीत ,परंतू आपल्या सोयीच्या अभ्यासकेंद्रावर ,आपल्या प्रवेशाच्यावेळी GENERAL ची जागा उपलब्ध नसल्यास आपणास आपल्या मूळ प्रवर्गाची कागदपत्रे दाखवून त्याच अभ्यासकेंद्रावर आपल्या प्रवर्गाची जागा मिळवता येईल. (हे Addrass label कापून Acceptance form वर 'Address label' असे लिहिलेल्या चौकटीत चिकटवा.)
6)आपणास मिळालेल्या Acceptance form मध्ये Anti ragging affidavit चे दोन फॉर्म आहेत , त्यापैकी एक विद्यार्थ्याने स्वत: करावयाचे असून दुसरे पालकानी करावयाचे आहे. त्यापैकी दोन्ही अॅफिडेविट आपणांस आपल्या Acceptance form सोबत जोडावयाचे आहेत.ते दोन प्रकारे करता येईल 1) त्यासाठी तो नमूना बॉन्ड वर DTP करुन घेऊन Affidavit करुन घ्यावे कारण अॅफिडेविट हे Notarized मागितलेले आहे, व प्रवेशाच्या वेळी इतर आवश्यक कागद्पत्रांसोबत जोडून सादर करावे.दोन्ही अॅफिडेविट चे फॉर्म या पेज च्या शेवटी दिलेले असून ते आपणास डाऊनलोड करून घेता येतील.2) किंवा ऑनलाईन करता येईल पुणे विभागीय केंद्राअंतर्गत ऑनलाईन अॅफिडेविट करण्याची सुविधा दिलेली असून ऑनलाईन अॅफिडेविट करण्यासाठी येथे क्लिक करा. ऑनलाईन अॅफ़िडेविट Notarized करण्याची गरज नाही, ऑनलाईन किंवा बॉन्ड वर यांपैकी एकाच प्रकारे अॅफिडेविट करावे.
  7) Course option proforma हा फॉर्म भरताना,म्हणजेच विषयाची निवड करतांना आपल्याला प्रथम वर्षासाठी 6A to 6E यांपैकी दोन अध्यापन पद्धतींचे विषय निवडायचे आहेत.यात आपली पदवी आपण कला शाखेतून जरी केलेली असेल तरीही आपण science किंवा mathematics हे विषय निवडू शकतो तसेच पदवी ला आपला English विषय नसेल तरीही आपण निवडू शकतो; म्हणजेच पाच पैकी कोणतेही दोन विषय निवडण्याचे आपणास स्वातंत्र्य आहे , तसेच द्वितिय वर्षासाठी 12A to 12E यांपैकी कोणताही एक विषय आपणास निवडायचा आहे  हे लक्षात असू द्या.शिवाय ENGLISH विषय वगळता सर्व विषयांचे माध्यम हिंदी निवडता येईल.


8) विभागीय केंद्रावर द्यावयाची कागदपत्रे :-
1) DD 
2) पोस्टाने मिळालेला बंच 
3) 10वी,12वी,डि.एड.,डिग्री(1st,2nd,3rd){ मार्कशीट व सनद/डिग्री व डिग्री नसेल तर पासिंग सर्टीफिकेट चालेल} या सर्वांची प्रत्येकी एक एक झेरॉक्स ,अटेस्टेड 
4) Experience(employment) certificate व असल्यास Authentication letter 
5) प्रवेश परीक्षेचे ओरिजिनल हॉलटिकिट 
6) Anti ragging affidavit (नोटरी केलेले किंवा ऑनलाईन प्रिंट) 
7) A .caste
B. validity C. noncreamylayer उत्त्पन्न प्रमाणपत्रासह.(प्रत्येकी एक झेरॉक्स अटेस्टेड) 
8) ओळखपत्र(आपणास ऑफर लेटर सोबत मिळालेले) [यांतील क्र .7 हा मुद्दा GENERAL मधून निवड झालेल्यांसाठी लागू नाही,तसेच SC/ST मधूननिवड झालेल्यांसाठी क्र. 7 मधील C. मुद्दा लागू नाही. ]
9) विभागीय केंद्रावर तपासून घ्यावयाची कागदपत्रे :- वरील यादीतील क्र. 3) व 7) मधील सर्व ओरिजिनल प्रमाणपत्रे त्याच क्रमाने लावून ठेवावीत म्हणजे तपासून घेतांना गोंधळ होणार नाही.तसेचआपण प्रवेश परीक्षेचा फाॅर्म भरताना त्यात दाखविलेल्या service experience चा पुरावा म्हणून आपली joining order व त्यानंतर बदली झालेली असल्यास सर्व बदल्यांचे आदेश व जमल्यास मूळ अथवा द्वितीय सेवापुस्तिका सोबत न्यावी.
10) DD काढतांना IGNOU NAGPUR (IGNOU व विभागीय केंद्राचे नाव) असा काढावा. DD च्या मागे पेंन्सिल ने ईग्रजी मध्ये NAME,
 ENROLLMENT NUMBER , PROG-BED एका खाली एक लिहावे.
11 Authentication letter हा यावेळेस गोंधळात टाकणारा मुद्दा असून हे प्रमाणपत्र आपणास डि.एड. चे प्रमाणपत्र देणारी संस्था म्हणजेच MSCE PUNE यांचेकडून घ्यावे लागेल.बरेचजण फोन द्वारे माझ्या संपर्कात असून त्या संस्थेचा पत्ता मी त्यांना दिला आहे , अजूनतरी कोणी हे प्रमाणपत्र आणल्याचे समजले नाही.पुणे व मुंबई विभागाची प्रवेश प्रक्रिया 10 ते 15 मे दरम्यान असून पुण्याला जाऊन प्रमाणपत्र आणणे या दोन्ही विभागासाठी सोयीस्कर आहे.असे प्रमाणपत्र जर सहजासहजी मिळू शकत असेल व वरील दोन विभागातील शिक्षकांनी अशी प्रमाणपत्रे काढून सादर केली तर नागपूर विभागातील शिक्षकांना 25 मे पूर्वी प्रमाणपत्रे काढणे शक्य होईल.पुणे व मुंबई विभागातील शिक्षकांनी हे प्रमाणपत्र काढणे शक्य न झाल्यास आपली डि.एड. च्या T.C . ची झेरॉक्स विभागीय केंद्रावर द्यावयाच्या कागद्पत्रामध्ये जोडून, तपासून घ्यावयाच्या कागदपत्रांमध्ये ओरिजिनल T.C. जोडावी. डिएड. ची T.C. हा आपण आपले डिएड. रेग्युलर किंवा face to face mode मध्ये केलेले असल्याचा सबळ पुरावा आहे, शेवटी तो त्यांना ग्राह्य धरावाच लागेल. पुणे व नागपूर विभागीय केंद्रांनी हाform offer letter सोबत दीलेला नाही त्यामूळे तोभरून नेणे यादोन्ही विभागातील उमेदवारांवर बंधनकारक नाही.


*संकलन सलीमशेख*
   *फर्दापूर(अजंठा लेणी)*
          *औरंगाबाद*
*९४०३९०४६९९*

2 comments:

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता