Total Pageviews

207989

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday, 14 October 2016

दांडीबहाद्दर शिक्षकांना हायकोर्टाची छडी!

दांडीबहाद्दर शिक्षकांना हायकोर्टाची छडी!
राज्यभरात ऑनलाइन हजेरीचा मार्ग मोकळा

व्हॉट्स अँपवर द्यावी लागेल शाळेत हजेरीपान ४ वरऔरंगाबाद : दांडीबहाद्दर शिक्षकांवर उच्च न्यायालयाची छडी बसली आहे. आता शिक्षकांना रोज शाळेत व्हॉट्स अँपच्या साह्याने हजेरी नोंदवावी लागेल. सध्या जळगाव जिल्ह्यातील हा पायलट प्रयोग राज्यातही राबविला जाणार आहे. अँड्रॉइड मोबाइल, नेटपॅकचा खर्च व इतर कारणांमुळे शिक्षक संघटनेने ऑनलाइन हजेरीस उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठाने या प्रकरणात गुरुवारी (दि. १३) हस्तक्षेप करण्यास नकार दिला व याचिका फेटाळली. त्यामुळे राज्यभरात ऑनलाइनचा हजेरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी शिक्षकांची ऑनलाइन हजेरी नोंदविण्यासाठी व्हॉटस् अँप व इझी स्ट्रॉम प्रणाली जिल्ह्यात सुरू केली. पंतप्रधानांच्या डिजीटल इंडिया अभियानाचा हा प्रयोग गेल्यावर्षी २९ जूनला प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला होता. हजेरी नियंत्रण पद्धतीसाठी प्रशासनाला ही बाब सोयीस्कर होती. पण पण अँड्रॉइड मोबाइल, नेटपॅकचा खर्च व नेटवर्क समस्येमुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनने ऑनलाइन हजेरीस विरोध करणारी याचिका दाखल केली. संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

१२00 टॅबचा लवकरच पुरवठा

हजेरी नोंदविण्याच्या प्रक्रियेत महिन्याला १00 रुपयांचा नेटपॅक खर्च

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता