Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 2 February 2017

माहौल...जबरदस्त,.. झिंगाट.... कार्यक्रम संपन्न...!!!

माहौल...जबरदस्त,.. झिंगाट.... कार्यक्रम संपन्न...!!!


जि.प.प्रा.शा.पिंपरी गो. येथे दिनांक १ फेब्रुवारी २०१७ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन निम्मित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चिकलठाणा केंद्राचे केन्द्रप्रमुख श्री. मधुकर काष्टे, चारठाना प्रशालेचे श्री रत्नाकर जोशी, अविनाश कंधारकर , शैला कलशेट्टी, अभिजित जन्मले, गिरीश सुवर्णकार, हरओम अन्तुरे, पुरुषोत्तम कामठेवाड, सुनील मोरे,ठाकरे एस पि, बोरकर, एस एम ,सुरवसे डी एम, इ.प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते. शा.व्य.समितिचे अध्यक्ष सर्जेराव कदम, सरपंच शिवनंदा सुर्वे, उपसरपंच सुभाष गोंडगे व मुख्याध्यापिका ज्योत्सना बोनलेवाड व आलेल्या पाहुण्यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले.
       चिकलठाणा केंद्राचे केन्द्रप्रमुख श्री मधुकर काष्टे यांनी डिजिटल स्कूल व इ लर्निंग चे महत्त्व सांगितले व गावकरी मित्रांना लोकनिधीसाठी उद्युक्त करुन मोलाचे मार्गदर्शन केले.जि.प.प्रा.
शाळा जवळा जिवाजी  येथील श्री हरओम अन्तुरे, यांनी ही स्वत:च्या डिजिटल झालेल्या शाळेचे अनुभव सांगुन शाळा इ लर्निंग करण्यासाठी प्रेरित केले. तसेच बेलूरा प्रशालेचे श्री गिरीश सुवर्णकार यांनी ही स्वतच्या विनोदी स्वभावाने श्रोत्याचे पोटधरून हसेपर्यंत मनोरंजन केले.  २० जबरदस्त नृत्य, डिजिटल स्कुल व शौचालय या ज्वलंत विषयांवर २ विनोदी नाटिका असा ४  तासांचा दणदनित कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडला.. लहान लहान चिमुकल्यांनी अत्यंत कलात्मकतेने नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक नृत्यास प्रमुख पाहुणे व गावकरी यांनी भरभरून बक्षिसे देत कार्यक्रम शेवटपर्यंत एन्जॉय केला.

शालेच्या फेसबुक पेजवर सर्व छायाचित्रे
www.facebook.com/PimpriGo

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता