Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Wednesday 6 December 2017

*मेमरी कार्डमधील माहिती रिस्टोअर कशी करायची

*मेमरी कार्डमधील माहिती रिस्टोअर कशी करायची?*
⬇
╭════════════╮
  ▌   *एस.पी.जोशी*          ▌
╰════════════╯
सौजन्य: लोकसत्ता
डिजिटल कॅमेरा असो किंवा फोन, एक चुकीचे बटण दाबले गेले की तुमची माहिती डिलिट होते. पण ही माहिती रिकव्हर करण्याची सोयही उपलब्ध आहे. मेमरी कार्डमधील डिलिट झोलेले फोटो रिकव्हर करण्यासाठी सर्वप्रथम ते कार्ड कार्डरीडरच्या साहाय्याने संगणकाला कनेक्ट करा. कार्ड कनेक्ट झाले की http://www.cardrecovery.com/download.asp कार्ड रिकव्हरीसाठी उपलब्ध असलेले हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आणि त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कार्डमधील डिलिट झालेले फोटो पुन्हा मिळवू शकता. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करणे आणि त्याच्या मदतीने माहिती पुन्हा रिकव्हर करून दिली जाते. पण यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात.
माझ्या मोबाइलमध्ये आठ जीबी अंतर्गत साठवणूक
क्षमता आहे. शिवाय मी १६ जीबीचे कार्डही वापरत आहे. असे असतानाही मला सतत मेमरी संपली असे सांगितले जाते. जर मला माहिती साठवायची असेल तर इतर कोणता पर्याय आहे का?
मोबाइल फोन असो किंवा संगणक, आपल्याकडील माहितीसाठा प्रचंड वाढू लागला आहे, यामुळेच साठवणुकीसाठी क्लाऊडचा पर्याय समोर आला. या क्लाऊड तंत्रज्ञानामुळेच आपण आपल्या विविध उपकरणांमधील माहिती आपल्या हातात असलेल्या उपकरणातही पाहू शकतो तसेच माहिती साठवण्यासाठीही मुबलक जागा मिळवू शकतो. यासाठी ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह, बॉक्स असे विविध अ‍ॅप्स अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर लॉगइन करून तुम्ही तुमची माहिती साठवून ठेवू शकता.
*'┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄'*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता