Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 28 April 2018

विरामचिन्हे

वाक्य पूर्ण झाले
हसून सांगे पूर्णविराम.
दोन छोटया वाक्यांना
सहज जोडे अर्धविराम.
एका जातीच्या शब्दांमध्ये
येऊन बसे स्वल्पविराम.
वाक्याच्या शेवटी बोले
तपशिलात अपूर्णविराम.
प्रश्न पडतो तेव्हा
धावून येई प्रश्नचिन्ह.
भावनांच्या रसात बुडून
उभे राही उदगार चिन्ह.
शब्दावर जोर पाडी
अवतरणचिन्ह एकेरी
कुणी बोले तिथेच दिसे
अवतरणचिन्ह दुहेरी.
कुठे घ्यावा विराम हे
चिन्ह सांगे अचूक
चिन्हांच्या सोबतीने
वाक्य लिहू बिनचूक.
चिन्ह वगळून वाक्य कसे ओंगळवाणे दिसे.
चिन्हांमुळेच वाक्याचा
अर्थ मनी ठसे.
फारच सुंदर! शिक्षकांनी योग्य उदाहरणे घेऊन ही कविता मुलांना शिकविली, चाल लावून म्हणून घेतली तर मुलांना खूप फायदा होईल.

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता