Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 20 May 2018

सरल महत्त्वाचे वाचता वाचता...

बदल्यांची पारदर्शकता व शिक्षकांची मानसिकता
         ┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄

       कसलेही वेळापत्रक नसलेल्या बदल्याने रोज मिनिटाला whatsapp उघडून पाहण्याची सवय लावली. कारण जे काही येणार ते whatsapp वरच.

आपला जिल्हा केव्हा येणार व आपली बदली होणार की नाही,आपल्याला कोणी खो देईल का याच चिंतेत शिक्षकांच्या अर्ध्या सुट्ट्या संपल्या ही. ऑनलाइन मुळे बरीच कामे सुकर व मानसिक तान न देणारी होतात, परंतु या बदल्याने फॉर्म भरण्यापासून ते ऑर्डर येईपर्यत आंधळी कोशिंबीर  खेळल्या सारखी व हाती काही न लागण्याची मानसिकता निर्माण केली. कारण  फॉर्म भरताना 20 गावे कोणती निवडावीत, कोणती रिक्त असतील किंवा कोणते गाव आपल्याला मिळेल, कुणी आपल्याला खो देईल का ,आपण कोणाकोणाला खो देऊ शकतो याचे केवळ अंदाज बांधावे लागले.अंदाज म्हणजे केवळ आंधळ्ा खेळ ! ज्यांचे अंदाज लागले ते खुश झाले. मग ते 19 नंबर चे गाव का भेटले असेना !

जिल्हाबदल्या साठी ही पद्धत वरदान ठरली असली तरी जिल्हातर्गत बदल्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

काही जिल्ह्यांच्या बदल्या झाल्या , याद्या प्रसिद्ध झाल्या, लोकांना कोण कुठे आणि कसे गेले हे समजू लागले..
आणि तक्रारी वाढल्या व लगेच यंत्रनेने याद्या दाखविने बंद केले. काय कारण होते कळले नाही परंतु यादयांची गुप्तता राखत थेट ऑर्डरच हातात आणि एकाच दिवसात जॉइन व्हा चे सक्त आदेश दिल्या गेले.

20 पैकी गाव नाही भेटले तर पुन्हा 20 गाव भरण्याची सुविधा लगेच देण्यात आली, परंतु कोणती गावे रिक्त आहेत किंवा नाहीत ते मात्र  ते सांगितले जाणार नाही.. म्हणजे पुन्हा अंदाज बांधायचे.

त्यात पुन्हा याबद्दल सोशल मीडिया वर बोलले तर कारवाईचे आदेश. म्हणजे हात पाय बांधून वर बुक्क्यांचा मार.
बोलायची ही मुभा नाही,आपलं दुखणं मांडन्याची ही सोय नाही. मेल केले तर कसलेच उत्तर ही नाही. आजकाल तर बदल्यांचे विषय ग्रुपवर सुरु झाले की  “This message was deleted.” हाच message जास्त पहायला मिळत आहे. शिक्षक तो शेवटी तो कारवाईला घाबरनारच ना, सत्य व पारदर्शकतेला विरोध नसतोच कुणाचा. परंतु एवढ्या प्रमाणात होणाऱ्या बदल्या व 20 गावे टाकण्यापासून ते ऑर्डर मिळेपर्यंत डोळ्याला पट्टी बांधून धावायला लावणारा कार्यक्रम कुठेतरी  मनात चिड निर्माण करतोच.  

शिक्षक हा चिंतन करणारा व समाजाची प्रगती करणारा अत्त्यंत महत्वाचा घटक. जिल्हा परिषदांच्या शाळा अव्वल आणन्याचे श्रेय ही याच जिल्हा परिषद शिक्षकाला जाते. आणि तोच जिल्हा परिषदेचा शिक्षक आज चिंताग्रस्त दिसत आहे ही विचार करायला लावणारी  गोष्ट आहे.

एस.पी.जोशी
spjoshi21@gmail.com
https://goo.gl/VjsSPM
===========================

5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. सर आपण प्रत्येक शिक्षकाच्या मनातले विचार मांडले
    Very nice sir ।

    ReplyDelete
  3. निश्चितच चांगले लिखाण

    ReplyDelete
  4. 100% बरोबर सर..खरच घुसमट होते.शिक्षकांची पिळवणूक चालू आहे.पण याचा शिक्षकांच्या मानसिकतेवर दिर्घकालीन परीणाम होणार हे निश्चित.

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता