Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 18 November 2018

हेडफोनच्या वापरामुळे होणारे नुकसान

ⓢⓟⓙ
*हेडफोनच्या वापरामुळे होणारे नुकसान*

*🚸 चळवळ तंत्रज्ञानाची 📽*
     _"पोस्ट तुमच्या कामाची"_
        🔅 पोस्ट क्र.03 🔅
               ♏🅰🅿
➖➖➖➖➖➖➖➖

       विज्ञानाने आपले जीवन सुखमय केले आहे तर दुसरी कडे काही समस्या पण वाढवल्या आहेत. आज आपण अश्याच एका सुविधे बद्दल बोलणार आहोत ती म्हणजे हेडफोन ज्याच्या मदतीने आपण गाणी ऐकतो, कॉलवर बोलतो याचा जसा फायदा आहे तसेच तो आपल्याला काही समस्या पण देतो.

हेडफोनच्या वापरामुळे होणारे नुकसान

*ऐकण्यात समस्या होणे* : जर तुम्ही 90 डेसीबल पेक्षा जास्त आवाजात संगीत ऐकत असाल तर तुमच्या कानाला इजा होऊ शकते. यासाठी आपल्याला सारखे गाणे ऐकण्या पासून वाचले पाहिजे. गाणी ऐकताना ठराविक वेळे नंतर ब्रेक घ्यावा. त्याच सोबत हेडफोनचा आवाज मध्यम ठेवावा.

*ऐकण्याची क्षमता गमावणे :* असे जवळजवळ सर्व इयरफोन मध्ये होते की त्यांच्यात उच्च डेसीबल साउंड वेव्स असतात ज्यांचा वापर केल्यामुळे तुमची ऐकण्याची क्षमता गमावली जाऊ शकते. ज्यामुळे कानांना गंभीर इजा होऊ शकते. जर तुम्ही 90 डेसीबल पेक्षा जास्त मोठा आवाज ऐकत असाल तर कानांना इजा होते. यासाठी सतत म्युजिक ऐकण्याचे टाळावे. तसेच आवाज मध्यम ठेवावा आणि एक दोन गाणी ऐकल्या नंतर थोड्यावेळ ब्रेक घ्यावा.

*कानात इन्फेक्शन :* मित्र आणि कुटुंबियांच्या सोबत हेडफोन शेयर केल्यामुळे कानाचे संक्रमण होऊ शकते. यासाठी जेव्हाही तुम्ही दुसऱ्याचा हेडफोन वापरता तेव्हा सैनीटाइजर ने हेडफोन स्वच्छ करावा.

*हवा खेळती राहण्यात समस्या* : आजकाल असे उच्च गुणवत्ता असलेले हेडफोन आले आहेत ज्यांच्या वापरामुळे कानाच्या आत मध्ये हवा खेळती राहत नाही अश्या हेडफोनचा वापर दीर्घकाळ केल्यामुळे कानात संक्रमण होऊ शकते तसेच तुम्ही ऐकण्याची शक्ती गमावू शकता.

*कानदुखी* : हेडफोन मध्ये उच्च आवाजात म्युजिक ऐकण्यामुळे कान दुखी होऊ शकते. याचा सततचा वापर कानामध्ये तीव्र वेदना निर्माण करू शकतात.

*मेंदू वर वाईट परिणाम* : तुमचा मेंदू देखील हेडफोनच्या वाईट परिणामाना सामोरा जात असतो. तुमच्या हेडफोन मधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी, तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम करत असतात. इयरफोन आपल्या कानाच्या आतील भागाच्या जवळ असतो त्यामुळे त्याचा आपल्या मेंदूवर अत्यंत वाईट परिणाम होतो.

*बाहेरील नुकसान* : इयरफोनच्या वापरामुळे अनेक प्रकारचे गंभीर परिणामांना सामोर जावे लागते. इयरफोनच्या वापरामुळे तुम्ही संपूर्ण जगासोबत डीसकनेक्ट होता ज्यामुळे अनेक अपघात होतात. आजकाल म्युजिक ऐकत असताना अनेक दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यावर किंवा घराच्या बाहेर इयरफोनचा वापर करू नये.

💫
  *एस.पी.जोशी*
www.espjoshi.blogspot.in
*┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता